Headlines

Global Maharashtra Breaking News

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव येथील शारदा विद्यालयाचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले. यावेळी घेण्यात आलेल्या खो-खो खेळात शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला. गुरुवारी पार पडलेल्या या तालुकास्तरीय स्पर्धांना तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्रस्तरीय व प्रभागस्तरीय स्पर्धां पाठोपाठ तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा…

Read Full News

आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलचा वार्षिक बक्षीस वितरण संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ- : आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी वर्षभरातील प्रशालेचा अहवाल वाचन, हस्तलिखिताचे प्रकाशन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन , बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थांच्या स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.यावेळी ॲड. स्वप्निल प्रभूआजगावकर, शाळा समिती अध्यक्ष अण्णा झाट्ये, आजगाव…

Read Full News

ई-सेवा केंद्राची दारुच्या नशेत तोडफोड करणाऱ्या संशयितास तात्काळ हद्दपार करा..

ई-सेवासंचालकांची प्रांताधिकाऱ्यांजवळ मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०४- : -ई-सेवा केंद्राची तोडफोड करुन संचालकास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस तात्काळ हद्दपार करा, अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी यांच्याजवळ -ई-सेवा केंद्र संचालकांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले की २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास प्रवीण उर्फ देवबा पुरुषोत्तम देऊलकर याने ई-सेवा केंद्र संचालक श्रेयस मुंज यांच्या…

Read Full News

श्री राम मंदिर उद्घाटनाच्या पत्रिकेची मालवणात वाटप…

उद्घाटना दिवशी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन.. मालवण (प्रतिनिधी) निमंत्रण स्वीकार करो… हम सबको अयोध्या चलना है… सियावर प्रभू रामचंद्र की जय… असा जयघोष करत अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराचे उदघाटन व श्री रामाच्या बालमूर्तीची प्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचे वाटप मालवणात घरोघरी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मंदिर उदघाटनाच्या दिवशी सर्वांनी आपापल्या घरी दिवे…

Read Full News

कांदळगाव येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नाम फलकाचे अनावरण

मालवण, दि प्रतिनिधीबोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धम्मसंस्था दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कांदळगाव येथे शाखा निर्माण केली आहे. त्याच्या नामफलकाचे अनावरण सिध्दार्थ विकास मंडळ कांदळगावचे मुंबईचे अध्यक्ष राजेश कदम यांचे हस्ते करण्यात आले. २५ डिसेंबर हा दिवस बौद्ध बांधवांसाठीच…

Read Full News

कोलगाव भोमवाडी येथील युवकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

⚡सावंतवाडी ता.०४-: कोलगाव भोमवाडी येथील कुलदीप अरुण राऊळ (३८) या युवकाचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कुलदीप राऊळ याला सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे निधन झाले. सावंतवाडी येथील नित्या आईस्क्रीम एजन्सीमध्ये तो सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होता. तत्पूर्वी सावंतवाडीत गवळी तिठा…

Read Full News

सोनारमळी मातीचा बंधारा

⚡वेंगुर्ला ता.०४-: रायसाहेब डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूलमधील इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी, सर्व कर्मचारी आणि पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी सतीश गावडे व भगवान गावडे यांच्या सहकार्याने मठ-सोनारमळी येथे मातीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधा-यामुळे मठ गावातील आईरवाडी, मोबारकरवाडी, गावठणवाडी तसेच आजूबाजूचा परिसरातील पाणीसाठा वाढणार असून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. बंधारा बांधताना मुख्याध्यापक एस. ए.जाधव, राष्ट्रीय…

Read Full News

परुळे येथे रास्त दर धान्य दुकानदार कर्मचारी संघटनेची सभा संपन्न…

⚡वेंगुर्ले ता.०४-: यासभेत परुळे चेअरमन तथा कुशेवाडी सरपंच यांनी, आज धान्य दुकानदार कर्मचारी यांनी पुढे येऊन आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी संप पुकारला, तो योग्य आहे. या संपास आम्ही संस्था चेअरमनचा पूर्ण पाठींबा आहे. अजूनही काही मदत लागली असल्यास संघटनेने निर्भयपणे सांगावे त्यासाठी लागेल ती मदत आम्ही संस्था चेअरमन व सरपंच या नात्याने तुम्हाला देवू असे जाहीर…

Read Full News

कुंभारमाठ येथे ७ रोजी रक्तदान शिबीर…

⚡मालवण ता.०४-: भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दत्ता सामंत मित्रमंडळातर्फे दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मालवण कुंभारमाठ येथे दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Full News

मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०४-:मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय ‘मधुसुदन कालेलकर’ यांची कोणतीही साहित्यकृती’ असा आहे. वयवर्षे १४ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख रक्कमेची पारितोषिके आणि…

Read Full News

You cannot copy content of this page