ई-सेवा केंद्राची दारुच्या नशेत तोडफोड करणाऱ्या संशयितास तात्काळ हद्दपार करा..

ई-सेवासंचालकांची प्रांताधिकाऱ्यांजवळ मागणी..

⚡सावंतवाडी ता.०४- : -ई-सेवा केंद्राची तोडफोड करुन संचालकास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस तात्काळ हद्दपार करा, अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी यांच्याजवळ -ई-सेवा केंद्र संचालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले की २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास प्रवीण उर्फ देवबा पुरुषोत्तम देऊलकर याने ई-सेवा केंद्र संचालक श्रेयस मुंज यांच्या ई सेवा केंद्रावर हल्ला करुन त्यांच्या ई सेवा केंद्रातील संगणक, प्रिंटर्सची तोडफोड करुन मुंज यांना जीवे मारण्याची धमकी दिली. देऊलकर यांच्यावर २० पेक्षा जास्त गुन्हे जिल्हयात दाखल आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीना हद्दपार करणे हे शहरात शांतता व सुव्यवस्था राखणेसाठी अत्यावश्यक आहे, झालेला हा प्रकार चुकीचा असून संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

You cannot copy content of this page