⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ- : आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी वर्षभरातील प्रशालेचा अहवाल वाचन, हस्तलिखिताचे प्रकाशन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन , बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थांच्या स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी ॲड. स्वप्निल प्रभूआजगावकर, शाळा समिती अध्यक्ष अण्णा झाट्ये, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, नाणोस सरपंच प्राजक्ता शेट्ये, उपसरपंच अमिता नाणोसकर, युवा उद्योजक सागर नाणोसकर, अनंत पांढरे, उत्तम सातोसकर, प्रा.कांबळे, मुख्याध्यापक उत्तम भागीत, मानसी परूळेकर, काव्या साळवी, समृद्धी परब, विद्यार्थी, पालक कर्मचारी उपस्थित होते. ॲड. स्वप्निल प्रभुआजगावकर, यशश्री सौदागर, अण्णा झाट्ये, सागर नाणोसकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले व त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मान्यवरांनी शाळेची घटत असलेली विद्यार्थी पटसंख्या याबाबत सर्वांनी एकत्र येत तसेच शाळेची उन्नत्ती कशी होईल याबाबत एकत्र येऊन विचार करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम भागीत, सूत्रसंचालन मानसी परूळेकर, अहवाल वाचन काव्या साळवी तर आभार प्रदर्शन समृद्धी परब यांनी केले.
