तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव येथील शारदा विद्यालयाचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-: सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले. यावेळी घेण्यात आलेल्या खो-खो खेळात शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला.


गुरुवारी पार पडलेल्या या तालुकास्तरीय स्पर्धांना तालुक्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्रस्तरीय व प्रभागस्तरीय स्पर्धां पाठोपाठ तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा शारदा विद्यालया मुलांनी बाजी मारली. या दोन्ही स्पर्धात खो-खोमध्ये प्राप्त केलेला प्रथम क्रमांक शाळेने तालुकास्तरीय स्पर्धेतही कायम राखला. तसेच लांबउडी मध्ये दशरथ पंढरीनाथ गावकर याने द्वितीय क्रमांक मिळविला. यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच शाळा निरवडे नं. १ च्या संघामध्ये शारदा विद्यालयाच्या ५ विद्यार्थीनी सहभागी होऊन द्वितीय क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, सच्चीदानंद मेस्त्री, माधवी शिरोडकर, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, शिक्षक पालक सदस्य, पालक आनंद शिरोडकर, अनुष्का शिरोडकर, मदन शिरोडकर, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, आनंद राणे, गजेंद्र गावडे, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, शिक्षक पालक यांचे शाळेच्यावतीने मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page