आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या आराध्य दैवतावर केलेले भाष्य हे संतापजनक…

संजू शिरोडकर:केवळ आपली वोटबँक सांभाळण्यासाठी चाललेला हा आव्हाडांचा अट्टाहास..

⚡सावंतवाडी ता.०४-: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या आराध्य दैवतावर केलेले भाष्य हे अतिशय संतापजनक आहे. वनवासाच्या काळात श्रीरामाने जो आहार घेतला तो फळे आणि कंदमुळे. याचे अनेक दाखले भावार्थ रामायणात आहेत. असे असताना आव्हाडांनी उधळलेली मुक्ताफळे निषेधार्ह आहेत. केवळ आपली वोटबँक सांभाळण्यासाठी व ठराविक मतदारांना खुश करण्यासाठी त्यांचा हा अट्टाहास चालला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो त्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन जाहीर माफी मागावी, असा सल्ला भाजपचे सावंतवाडी माजी शहर अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांनी आव्हाड यांना दिला आहे.
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलत असताना उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा ॲड. संजू शिरोडकर यांनी जाहिर निषेध केला आहे. आव्हाडांनी कोणतेही वक्तव्य करताना आधी अभ्यास करावा, असे शिरोडकर यांनी म्हटले आहे

You cannot copy content of this page