कोलगाव भोमवाडी येथील युवकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

⚡सावंतवाडी ता.०४-: कोलगाव भोमवाडी येथील कुलदीप अरुण राऊळ (३८) या युवकाचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कुलदीप राऊळ याला सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे निधन झाले.

सावंतवाडी येथील नित्या आईस्क्रीम एजन्सीमध्ये तो सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होता. तत्पूर्वी सावंतवाडीत गवळी तिठा येथील अहिल्या मेडिकलमध्येही त्याने काम केले होते. गावातील सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमातही त्याचा सक्रिय सहभाग असायचा. शांत, मनमिळावू व कष्टाळू स्वभावाच्या कुलदीपच्या अकाली व आकस्मित निधनाने कोलगाववासियांसह त्याच्या मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे.त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. कोलगाव सरपंच संतोष राऊळ तसेच संदेश राऊळ यांचे ते भाऊ होत.

You cannot copy content of this page