मालवण, दि प्रतिनिधी
बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धम्मसंस्था दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कांदळगाव येथे शाखा निर्माण केली आहे. त्याच्या नामफलकाचे अनावरण सिध्दार्थ विकास मंडळ कांदळगावचे मुंबईचे अध्यक्ष राजेश कदम यांचे हस्ते करण्यात आले.
२५ डिसेंबर हा दिवस बौद्ध बांधवांसाठीच नव्हे तर हिंदू धर्मातील रुढी, परंपरामुळे महीला व शुद्र वर्णातील बहुजन समाजातील लोकांना समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय मिळवून देण्यासाठी बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले व मानव मुक्तीचे आंदोलन केले होते. या दिनाचे औचित्य साधून जागतिक बौद्ध संघटनेचे सचिव व दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेची दहा उद्दीष्टांची पुर्तता करण्यासाठी गतिमान काम करत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत काम केलेले धर्माजी कदम यांचे नातु राजेश कदम यांच्या हस्ते कांदळगाव येथे शाखा निर्माण करुन नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त एसटी कर्मचारी सहायक वाहतूक निरीक्षक तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ कदम यांनी भुषविले होते. जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम, सुर्यकांत बिबवणेकर, चंद्रकांत जाधव, राजेंद्र कदम, विष्णू अणावकर, पी. के. चौकेकर, सिध्दार्थ जाधव, पुरुषोत्तम मालवणकर, हरिश्चंद्र कदम, नेरुरकर, बी. एच. कदम, बबन मालवणकर, लहु कदम, गंगाधर कदम, दिपक कदम, प्रा. शैलेश कदम, कांचनमाला कदम, सचिन कासले, रोहन कदम, अभिमन्यू कदम, अनिल कदम, पुजा कदम, रोहीणी कदम, दिपाली कदम, सुशिल कदम, सलील कदम, हर्ष कदम, गौरी कदम, वैभव कदम, अंजली कदम हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार विद्याधर कदम यांनी मानले.
