मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०४-:
मालवण येथील नगर वाचन मंदिर तर्फे शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय ‘मधुसुदन कालेलकर’ यांची कोणतीही साहित्यकृती’ असा आहे.

वयवर्षे १४ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख रक्कमेची पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. स्पर्धकांची नावे दि. १६ जानेवारी पर्यंत ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत समक्ष आणून द्यावीत. अधिक माहितीसाठी श्रेया चव्हाण, सहायक ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर (८३९०६९४३३१) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे दि. २१ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत थेट सहभाग मिळेल. मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page