Headlines

Global Maharashtra Breaking News

मडुऱ्यात ‘गौरी’ने दिला दोन वासरांना जन्म…

बघ्यांची होतेय गर्दी : गायसह वासरे सुखरूप ⚡बांदा ता.१८-: मडुरा परबवाडी येथील शेतकरी पशुपालक शांताराम नार्वेकर यांच्या गौरी गायने एकाच वेळी दोन वासरांना जन्म दिला. सावंतवाडी तालुक्यात एकाच वेळी दोन वासरांना जन्म देणारी ही दुर्मिळ व पहिलीच घटना असल्याचे जाणकार पशुपालकांनी सांगितले. दरम्यान मडुरा पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी रवी पेडणेकर यांनी गायसह वासरांची पाहणी करून वासरे…

Read More

बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ च्या पालकांनी आज सकाळपासून शाळा बंद आंदोलन सुरू…

⚡बांदा ता.१८-: बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ च्या पालकांनी आज सकाळपासून शाळा बंद आंदोलन सुरु केले असून शेकडो पालक व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले आहेत. उपशिक्षणाधिकारी श्री थोरात व गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी याठिकाणी येत पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकांनी जोपर्यंत शाळेची इमारत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर…

Read More

मनसे तर्फे २४ ऑक्टोबर दसऱ्यादिवशी मालवण बंदरजेटीवर भव्य खुल्या गरबाचे आयोजन…

वेशभूषा स्पर्धा,आकर्षक बक्षिसे, भव्य लकी ड्रॉ स्पर्धा अश्या विविध बक्षिसांची मांदियाळी… ⚡मालवण ता.१७-:महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याच्यावतीने यावर्षीही दि २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्यादिवशी मालवण बंदरजेटीवर भव्य खुल्या गरबाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धा,आकर्षक बक्षिसे तसेच यंदा विशेष आकर्षण म्हणून लकी ड्रॉ स्पर्धा अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण…

Read More

चंद्रशेखर बावनकुळे हे सुपर वॉरियर्स बैठक, घर चलो अभियान, व चौकसभाही घेणार…

आम.नितेश राणे:वरिष्ठ नेतेमंडळी ठरवतील त्या उमेदवाराला खासदार करणार.. ⚡कणकवली ता.१७-: रत्नागिरी सिंधदुर्गचा खासदार महायुतीचे वरिष्ठ नेतेमंडळी एकत्रित बसून ठरवितील. मात्र, जो उमेदवार ठरविला जाईल, त्याचे सर्वांनी मिळून एकत्रित काम करून निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे असे आम.नितेश राणे यांनी सांगितले.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महाविजय २०२४ अंतर्गत १९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत…

Read More

ही तर मंत्री रवींद्र चव्हाणांसोबत नमकहरामी…

आम.नितेश राणे:संदेश पारकर, अतुल रावराणे यांना लगावला टोला.. ⚡कणकवली ता.१७-:एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरगुती कार्यक्रमात मित्र म्हणून हजर राहायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच खात्यावर टीका करायची ही रवींद्र चव्हाण यांच्याशी नमकहरामी असल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी संदेश पारकर, अतुल रावराणे यांची नावे न घेता लगावला.तळेरे गगनबावडा रस्त्याच्या दुरावस्थेवरून उबाठा शिवसेना पदयात्रा काढणार…

Read More

नेमळे वनरक्षक बबन रेडकर यांना मातृशोक

⚡सावंतवाडी ता.१८-: मळगांव रेडकरवाडी येथील रहिवासी श्रीमती सत्यभामा भिकाजी रेडकर यांचे मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन विवाहीत मूली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. नेमळे विभागाचे वनरक्षक रामचंद्र उर्फ बबन रेडकर यांची ती आई तर मळगांव ( वेत्ये ) रास्त धान्य…

Read More

सिंधुदुर्ग दिव्यांग मालवण शहर संघटनेतर्फे १९ रोजी बैठक

⚡मालवण ता.१८-: सिंधुदुर्ग दिव्यांग मालवण शहर संघटनेतर्फे दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता दत्त मंदिर भरड मालवण येथे नगरपालिका दिव्यांग निधी करिता हयात दाखल्यासाठी व नवीन फॉर्म भरणाऱ्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, दिव्यांग असलेल्यांचे सिव्हिल सर्जन सर्टिफिकेट यांचे झेरॉक्स प्रत, दोन फोटो घेऊन येणे आवश्यक आहे. बैठकीला…

Read More

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी जाहीर…

राज्य कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र ⚡कणकवली ता.१७-:मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, खास.डॉ. श्रीकांत शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तालुका कक्षप्रमुख, कणकवली ६ महिन्या करिता निवड करण्यात आली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०१+१०४) राखीव खाटा उपलब्ध…

Read More

मालवणातील राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अन्यत्र हलविण्याच्या हालचाली…

नाट्यप्रेमींचा तीव्र विरोध:तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.. मालवण (प्रतिनिधी) सन २०१८ पासून गेली सहा वर्षे राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे प्राथमिक फेरीचे केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सुरळीत सुरु असताना हे केंद्र जिल्ह्यातील इतर तालुक्यात हलविण्यात येणार असल्याचे वृत्त असल्याने मालवणातील नाट्यप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. मालवणातील केंद्र अन्यत्र हलविण्यास मालवणच्या रंगकर्मीचा, बहुतांश नाट्यसंस्थांचा…

Read More

विविध शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

२२५ हून अधिक जणांनी घेतला लाभ:भाजपाचे माजीनगरसेवक आप्पा लुडबे मित्रमंडळाच्या वतीने आयोजन.. ⚡मालवण ता.१८-: मालवण नगरपरिषद भाजपाचे माजीनगरसेवक आप्पा लुडबे मित्रमंडळाच्या वतीने भरड – वायरी,देऊळवाडा परिसरात मोफत रक्त तपासणी, डोळे तपासणी तसेचआभा कार्ड नोंदणी, आधारकार्ड अपडेट शिबीर आयोजित करण्यात आले. पहिल्या दिवशी सुमारे २२५ हून अधिक जणांनी लाभ घेतला. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत…

Read More
You cannot copy content of this page