शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष पदी विठ्ठल गवस तर सरचिटणीस पदी तुषार आरोसकर यांची निवड…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस पदी तुषार आरोसकर तर जिल्हा शिक्षक नेते पदी सुरेखा कदम यांची निवड करण्यात आली.
शिक्षक समिती सिंधुदुर्गचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच संपन्न झाले.या अधिवेशनात संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी विषय नियामक सभेत निवड करण्यात आलेली सन २०२४ ते २०२७ या कालावधी साठीची कार्यकारिणी घोषित केली.
संघटनेची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे,उपाध्यक्ष -धीरज हुंबे,रुपेश गरुड,कार्याध्यक्ष-संतोष कुडाळकर,कोषाध्यक्ष-कालिदास खानोलकर,प्रवक्ता-सुधीर गोसावी,प्रसिद्धीप्रमुख-विनायक जाधव,संपर्कप्रमुख-राजन जोशी,पंढरीनाथ सावंत,जिल्हा उपाध्यक्ष-प्रवीण ठाकूर,उमेश निवतकर,अजय तांबे,सचिन पवार,कार्यालयीन चिटणीस-महादेव शेटये,कर्पूरगौर जाधव,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष-निकिता ठाकूर,सरचिटणीस-वैभवी कसालकर,महिला उपाध्यक्ष-नेहा मोरे,प्रिया जाधव,नीलम बांदेकर,ज्योती पवार,विभागीय अध्यक्ष-विनोद कदम,समीर सरवणकर,तानेश्वर कदम,विभागीय उपाध्यक्ष-किशोर गोसावी,सुनिल जाधव,नवीन जाधव,जयवंत जोशी,सल्लागार-सुनील चव्हाण,त्रिंबक आजगावकर,नितीन कदम,संदीप गोसावी,महेश काळे,संजय परब,महिला संघटक-विनिता शिरसाट,रिया सांगेलकर,सोनाली केरकर,स्मिता गवंडे,स्नेहल राणे,रुपा नाईक,दिव्यांका वाणी,जिल्हा संघटक-रामचंद्र कदम, गोपाळ गावडे,नरेंद्र बावलेकर,निलेश ठाकूर,ईश्वरलाल कदम,मयुरेश करंदीकर,रवींद्रनाथ गोसावी,जे.डी.पाटील,स्वप्नील गुरखे,स्वप्नील भोसले,अमित पाटील,अशोक भोसले,सतीश राऊळ,रामनाथ गोसावी,पदसिद्ध सदस्य-शिक्षक बॅंक संचालक नारायण नाईक,संतोष राणे,चंद्रसेन पाताडे,विजय सावंत, संतोष मोरे,श्रीकृष्ण कांबळी,सचिन बेर्डे,सीताराम लांबर,मंगेश कांबळी, ऋतुजा जंगले,तसेच सर्व तालुकाध्यक्ष व तालुका सचिव व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी हे पदसिद्ध सदस्य म्हणून घोषित करण्यात आले.
नूतन कार्यकारिणीला राज्य,जिल्हा व तालुका पदाधिकारी, तसेच समस्त शिक्षक वर्गातून शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page