बंटी पुरोहित: मुख्याधिकारी यांच्याकडे केले निवेदनद्वारे मागणी..
⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी शहरात मुख्यद्वार असलेल्या गवळी तिठा व बस स्थानक परिसरात कोणत्याही स्वच्छतेची काळजी न करता उघडपणे मासे विक्रेत्या करणाऱ्यांवर कारवाई करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
दरम्यान मासे विक्री करणाऱ्या चा प्रकार गेले काही महिने शहरात दिसून येत आहे त्यामुळे बस स्थानक येथे मोठ्या प्रमाणात खाणीचा साम्राज्य होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तरी आपण लक्ष देऊन यावर योग्य तो निर्णय घ्यावे अशी मागणी देखील श्री पुरोहित यांनी यावेळी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
