Headlines

Global Maharashtra Breaking News

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत भाजपच्यावतीने विविध कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.१७-: अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजप पक्षाच्यावतीने मोहिनी मडगावकर व महिला मोर्चा भाजप सावंतवाडी आयोजित सावंतवाडीकरांसाठीभोसले उद्यान येथे 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दुपारी १२ वाजता श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेच विधीवत पूजन, तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजल्यापासून महिला मोर्चा सावंतवाडी कडून सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिलांसाठी…

Read More

मळगाव येथे विषारी घणसास जीवदान…

सर्पमित्र आनंद राणे यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात.. ⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ -: मळगाव रस्तावाडी येथील मारुती बांदेकर यांच्या घराच्या अंगणात आलेल्या विषारी घणसास निवृत्त सैनिक तथा सर्पमित्र आनंद नाना राणे यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.गेले काही दिवस हा विषारी घणस येथील रहिवाश्यांना रात्रीच्या वेळी भर रस्त्यात दिसत असल्याने त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील…

Read More

झाराप मध्ये उबाठाला मोठा धक्का…

⚡कुडाळ ता.१७-: झाराप पंचक्रोशीतील युवानेतृत्व श्री.अनिकेत तेंडुलकर,बाबू खान यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती वर्षाताई कुडाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थित शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री.बबनजी शिंदे,तालुकाप्रमुख श्री.योगेश तुळसकर,वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर,महिला आघाडी तालुकाप्रमुख श्रीमती सिद्धी शिरसाट,शिवसेना उपतालुकाप्रमुख,विभागप्रमुख आदी…

Read More

बॅ. नाथ पै सेवांगणच्या अध्यक्षपदी ऍड. देवदत्त परुळेकर यांची निवड…

कार्याध्यक्षपदी पद्मनाभ शिरोडकर व कार्यवाहपदी लक्ष्मीकांत खोबरेकर.. ⚡मालवण ता.१७-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण या संस्थेच्या निवडणूकीनंतर झालेली विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळाची निवड बिनविरोध झाली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी अॅङ देवदत्त परुळेकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी पद्मनाभ उर्फ किशोर शिरोडकर आणि कार्यवाहपदी लक्ष्मीकांत खोबरेकर यांची निवड करण्यात आली. बॅ. नाथ पै…

Read More

मी कोणत्याही चौकशीला सामोरा जाण्यास तयार…

अजयकुमार सर्वगोड :माजी आम.उपरकर यांनी तक्रारी करण्यापेक्षा विकासात मार्गदर्शन करावे ⚡कणकवली ता.१७-: माजी आम. परशुराम उपरकर यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाच्या चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. शासनाचा एकही रुपयाही वाया न जाण्यासाठी आम्ही काम करत आहोत.परशुराम उपरकर यांनी जिल्ह्याच्या विकासात्मक काम करावे ,मात्र ते माहितीचा अधिकार टाकून आमच्यासारख्या अधिकाऱ्यावर दबाव आणत आहेत. त्यापेक्षा उपरकर यांनी…

Read More

…अन्यथा सार्वजनिक बांधकाम विरोधात फेब्रुवारीत आंदोलन छेडणार

माजी आम.परशुराम उपरकर यांचा कार्यकारी अभियंत्यांना इशारा.. ⚡कणकवली ता.१७-: कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना काम देतात. आम्ही मागवलेल्या माहीतीच्या अधिकारातील माहितीमध्ये चुकीचा खुलासा देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यात केलेल्या कामांमध्ये सगळा सावळा गोंधळ असुन त्यांच्या कारभाराची कसुन चौकशी व्हावी. अशी मागणी सचिवांकडे करण्यात येईल. योग्य तो खुलासा न झाल्यास फेब्रुवारीत…

Read More

कणकवलीत व्हिडिओ गेम पार्लरला पोलिसांचा दणका…

तब्बल 44 मशीन जप्त;जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई.. ⚡कणकवली ता.१७-: व्हिडिओ गेम पार्लरवर कणकवली पोलिसांनी लक्ष वळविले असून कणकवली शहरातील तब्बल 5 व्हिडिओ गेम पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कणकवली मधील पाच व्हिडिओ गेम पार्लर मालक, पाच चालक व दोन खेळाडू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.यात 40 हजार रुपयांची रोख रक्कम व…

Read More

गोगटे वाळके महाविद्यालयात आरोग्य विषयक शिबिर संपन्न…

⚡बांदा ता.१७-: येथील गोगटे वाळके महाविद्यालयात दि. 16 जानेवारी रोजी महिला विकास कक्षाच्या अंतर्गत “आरोग्यावर बोलू काही” या विषयावर आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता म्हणून सहज ट्रस्टच्या अध्यक्ष आणि मानसोपचार तज्ञ मीनाक्षी मॅडम उपस्थित होत्या.” विद्यार्थ्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे तरच सामाजिक आरोग्य चांगले राहील”, असे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना…

Read More

बांदा विठ्ठल मंदिरात २२ व २३ ला श्रीराम आनंदोत्सव…

⚡बांदा ता.१७-: अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात २२ व २३ जानेवारी रोजी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आल्याची माहीती आयोजनप्रमुख बांद्यातील ज्येष्ठ भजनकर्मी गिरिश महाजन व प्रकाश मिशाळ यांनी दिली.    सोमवार दि.22 रोजी श्री विठ्ठल मंदिरात सकाळी नित्यपुजा होऊन…

Read More

मालवण येथील सायली गोवेकर यांनी साजरा केला पर्यावरणपूरक हळदीकुंकू…

वाण म्हणून चंदनाची रोपे वाटत करत निर्माण केला आदर्श.. ⚡मालवण ता.१७-: मकरसंक्रांती निमित्त सध्या घरोघरी सुवासिनींकडून हळदीकुंकू समारंभ आयोजित करून आलेल्या महिलांना वाण म्हणून विविध प्रकारच्या वस्तू देण्यात येत आहेत. मात्र मालवण येथील नर्सरी निर्मितीच्या मालक सौ. सायली संजय गोवेकर यांनी वाण म्हणून चंदनाची रोपे वाटत पर्यावरण पूरक हळदीकुंकू समारंभाचा आदर्श निर्माण केला आहे. सौ….

Read More
You cannot copy content of this page