शिवडाव येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त 1 पासून विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२८-: शिवडाव-तांबटवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा 33 वा वर्धापन दिन 1 ते 4 मे या कालावधीत साईनाथ सेवा मंडळातर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
1 व 2 मे या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 10 यावेळेत विविध क्रीडा स्पर्धा, रेकाॅर्ड डान्स व खेळ पैठणीचा हे कार्यक्रम होतील. शुक्रवार 3 मे रोजी सकाळी 8.30 वा. आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर, 11.30 वा. विविध क्रीडा प्रकार, 12.30 वा. आरती व तीर्थप्रसाद, 1 वा. महाप्रसाद, 3 वा. साईंची पालखीचे मिरवणूक, सायंकाळी 7 वा. आरती, 8 वा. महाप्रसाद, रात्री 10 वा. श्री स्वामी समर्थ प्रा. भजन मंडळ, कांजूरमार्ग-मुंबईचे बुवा पांडुरंग सावंत व श्री स्वामीनारायण प्रा. भजन मंडळ, नवी मुंबईचे बुवा दिगंबर सुद्रिक यांच्या डबलबारीचा सामना होणार आहे. शनिवार 4 मे रोजी 5.30 वा. काकड आरती, सकाळी 8.30 वा. साई पादुका पूजन व अभिषेक, 9.30 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12 वा. महाआरती व तीर्थप्रसाद, 1वा. भंडारा (महाप्रसाद), 3.30 वा. हरिपाठ, 5.30 वा. सत्कार समारंभ, सभासदांसाठी बक्षीसांची सोडत, रात्री 8 वा. भजन, 8.30 वा. आरती, 9 वा. महाप्रसाद, रात्री 10 वा. अमृतनाथ पारपंरिक दशावतारी नाट्यमंडळ, वेगुर्ले यांचा महान पौराणिक प्रयोग सादर होईल. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page