कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपच्या सोशल मीडिया निरीक्षकपदी विकास पवार यांची तर आयटी निरीक्षकपदी प्रणय गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार व गावकर यांची निवड केली आहे. विकास पवार यांचे सोशल मीडियावरील काम उल्लेखनीय असल्याने पक्षाने त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीबद्दल रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पवार व गावकर यांचे अभिनंदन केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भाजपसोशल मीडिया निरीक्षकपदी विकास पवार यांची नियुक्ती…
