श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे  ३० एप्रिला होणार साजरा…

⚡बांदा ता.२८-: विलवडे (ता.सावंतवाडी) येथील माहेरवाशीणच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेला श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वाढदिवस सालाबादप्रमाणे  मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      सकाळी ८ वाजता अभिषेक, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थ प्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ठीक १० वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा दणदणीत ट्रिकसीन नाट्य प्रयोग ‘व्यंकटेश पद्नावती’ आयोजित केलेला आहे. तरी सर्व माहेर वाशिणी, भक्त-भाविक व नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान कमिटी- गाव मर्यादा व विलवडे ग्रामस्थ यांनी केले आहे.
फोटो:-
श्री देव खांबलेश्वर.

You cannot copy content of this page