Headlines

Global Maharashtra Breaking News

निवडणूक जातपडताळणीसाठी भरलेली फी पात्र उमेदवारांना परत द्या

माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणीसाठी उमेदवारांकडून ५०० रुपयांची फी जमा करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे अनेक उमेदवारांना या प्रक्रियेचा लाभ मिळाला नसल्याने त्यांच्याकडून जमा करण्यात आलेली फी परत करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम…

Read Full News

तुकाराम मुंढेंसारखे काम करा; नागरिकांच्या सेवेत पारदर्शकता ठेवा – पालकमंत्री ना.नितेश राणे

कणकवली : “राज्यात महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे प्रामाणिक प्रशासन, पारदर्शक कारभार आणि प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने कायम ठेवावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकांशी सुसंवाद ठेवून त्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखावी. दुर्गम व डोंगराळ भागात ऑनलाइन सुविधांमध्ये अडचणी असल्यास आवश्यकतेनुसार ऑफलाइन सुविधाही…

Read Full News

योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत…

आमदार निलेश राणे:कुडाळमध्ये ‘समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ,समाधान शिबिरात योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आम. राणेंचा भर.. ⚡कुडाळ ता.३१-: सरकारचा पैसा आणि योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी आज अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तुमचे काम केवळ स्टॉल उभारण्यापुरते मर्यादित राहता कामा नये. नागरिकांनी रस्त्यावर येऊन अधिकाऱ्यांचे कौतुक…

Read Full News

कट्टा येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ चा उद्घाटन समारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीप व धूप प्रज्वलन करून करण्यात आली. तदनंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. मालवण…

Read Full News

व्ही. एन. नाबर प्रशालेत गुरूवंदनेने गुरूपौर्णिमा सोहळा संपन्न…

बांदा/प्रतिनिधीमाणसाच्या जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व असून, शिक्षकांना वैदिक काळापासून गुरूचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, असा संदेश बांदा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत उत्साहात साजऱ्या झालेल्या गुरूपौर्णिमा सोहळ्यात देण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जगतगुरू व्यासमुनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच ज्यांच्या नावाने विद्यालय…

Read Full News

बांदा येथे स्वलिखित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नट वाचनालयात शनिवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३.३० वाजता स्वलिखित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यापुरती मर्यादित असून ती दोन गटांत होणार आहे. पहिला गट इयत्ता पाचवी ते दहावी आणि दुसरा गट खुला राहणार आहे. स्पर्धकांनी स्वलिखित पावसाळी…

Read Full News

वेंगुर्ला येथील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार – चित्रकार सुदर्शन कुडपकर यांचे निधन

वेंगुर्लावेंगुर्ला कॅम्प भटवाडी येथील रहिवासी ज्येष्ठ श्री गणेश मूर्तीकार व चित्रकार सुदर्शन कुडपकर (वय ७४) यांचे आज शुक्रवारी दि. ३१ जुलै रोजी सकाळी दुःखद निधन झाले. कला, सर्जनशीलता आणि उत्कृष्ट कारागिरीच्या माध्यमातून त्यांनी समाजात आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या हस्ते साकारलेल्या गणेशमूर्ती आणि विविध कलाकृतींमुळे त्यांनी कला क्षेत्रात मानाचे स्थान मिळविले होते. त्यांच्या निधनाने कला…

Read Full News

काळाचे भान राखत जीवनात लाभलेल्या गुरूंचा सन्मान करा : प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर

बांदा/प्रतिनिधीझपाट्याने बदलत असलेला आधुनिक कालखंड हा स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असून, जीवनात भेटलेल्या प्रत्येक गुरूचा सन्मान करायला शिकले पाहिजे. व्यक्तिमत्त्व घडत असताना विविध संस्कारांचा प्रभाव पडत असतो. ते आत्मसात करून जीवन समृद्ध करणे आवश्यक आहे. सतत ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती माणसाला उंचीवर घेऊन जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक प्रा. डॉ. एम. एन….

Read Full News

सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी…

व्ही. पी. व्ही. युग्का मूर्ती यांचे सहकार्याचे आश्वासन.. ⚡बांदा ता.३१-: इंडो-लॅटिन अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे व्हाईस प्रेसिडेंट, अपेडाचे सल्लागार तथा आंतरराष्ट्रीय बँकिंग, फंड वितरण आणि आयात-निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ व्ही. पी. व्ही. युग्का मूर्ती यांनी बांदा येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. कंपनीचे चेअरमन विलास सावंत यांनी त्यांचे स्वागत करून कंपनीच्या भविष्यातील वाटचालीबाबत…

Read Full News

दिव्यांग विकास केंद्राला कायमस्वरूपी जागा द्या…

सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे यांची नगराध्यक्षांकडे मागणी.. ⚡सावंतवाडी,ता.३१-: सावंतवाडी येथील दिव्यांग विकास केंद्राला कायमस्वरूपी व हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी नगराध्यक्षा श्रद्धा राजेभोसले यांच्याकडे मागणी केली असतात त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. गेली आठ वर्ष सदर दिव्यांग केंद्र इकडून तिकडे स्थलांतर करीत होते परंतु सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या प्रयत्नामुळे आता त्याला…

Read Full News

You cannot copy content of this page