Headlines

Global Maharashtra Breaking News

…तर बारसू व नाणारवासीयांची राज ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी

खा. विनायक राऊत यांचे आव्हान : आपल्या हक्काचा खासदार म्हणून मला पुन्हा लोकसभेत पाठवा.. ⚡कणकवली ता.०५-: रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली बारसू व नाणार गावात विनायक राऊत यांनी एक इंच देखील जमीन खरेदी केल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुरव्यानिशी सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास राज यांनी बारसू व नाणार गावात जाऊन ग्रामस्थांची जाहीररित्या माफी मागावी,…

Read More

केसरकर खेळतायत रडीचा डाव…

रुपेश राऊळ; सभेची परवानगी असताना देखल प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी लावली राणेंची सभा.. ⚡सावंतवाडी ता.०५-: आमची आजच्या सभेला देखील गांधी चौकात परवानगी असताना देखील केसरकर यांनी प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी राणेंची सभा लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केसरकर यांचा थंड दहशतवाद हा जनतेसमोर उघड झाला आहे असा आरोप उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ…

Read More

राणेंन सोबत गेल्याने केसरकरांची राजकीय अधोगतीकडे…

संदेश पारकर; तेली आमदार होणार या भीतीने केसरकर सैरभर.. ⚡सावंतवाडी ता.०५-: मी राणेंन सोबत गेलो ही माझ्या आयुष्यात खूप मोठी चूक केली त्यामुळे केसरकरही आज राणेंसोबत गेले त्यामुळे त्यांची ही वाटचाल आता अधोगतीकडे सुरू आहे, अशी टीका उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज इथे केली. तर या ठिकाणी बीजेपीच्या माध्यमातून काम करणारे राजन तेली…

Read More

सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद…

विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ:वातावरण केले भाजपामय.. ⚡सावंतवाडी ता.०५-: सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॕली काढण्यात आली. यावेळी सर्व वातावरण भाजपामय होऊन गेले. यावेळी त्याच्यासोबत माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, माजी सभापती रवी मडगांवकर, ॲड. अनील निरवडेकर वामन नार्वेकर…

Read More

कोकणात येणाऱ्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध का..?

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना रोखठोक सवाल ः कणकवलीत राणेंच्या प्रचारार्थ राजगर्जना.. कणकवली ः भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अडिच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धव यांनी भाजपची साथ सोडली असती का? नाणारमध्ये कोणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत? विरोधकांच्या भूलथापांना कोकणासीयांना बळी पडायचे आहे का? असे खडे सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. कोकणात कोणताही…

Read More

इथल्या आमदाराचा वाचपा विधानसभेत काढू…

वैभव नाईक:विरोधक आपल्याला मुर्ख बनविण्यासाठी एकत्र आले आहेत.. ⚡सावंतवाडी ता.०४-: शिवसेना कुणाची विचारणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही गर्दी आहे. इथल्या आमदारांना सर्वकाही देऊन त्यांनी फसवणूक केली आहे. त्याचा वचपा आपण विधानसभेत काढू. विकास करू न शकल्यान भाजपला जाहीराती कराव्या लागत आहेत. कॉग्रेसच्या योजना आपल्याच असल्याचं भाजप सांगत आहेत. जनतेच्या तीन लिस्ट करुन मतांसाठी पैसे…

Read More

अडीच लाखांच्या मताधिक्यात एकही मत कमी होणार नाही…

विनायक राऊत:नारायण राणेंचा दहशतवाद संपवला म्हणणारे दीपक केसरकर आज त्यांनाच घट्ट मिठी मारत आहेत… ⚡सावंतवाडी ता.०४-: अडीच लाखांच्या मताधिक्यात एकही मत कमी होणार नाही. ही भूमी पवित्र आहे. नारायण राणेंचा दहशतवाद संपवला म्हणणारे दीपक केसरकर आज त्यांनाच घट्ट मिठी मारत आहेत. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली. दरम्यान सींगल पैशाची चहा न…

Read More

मुंबई-गोवा हायवे पूर्ण न करणाऱ्या भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच वेळ…

आदित्य ठाकरे: ‘कोकणसाठी योगदान देणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना दिल्लीला पाठवा.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मुंबई-गोवा हायवे पूर्ण न करणाऱ्या भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच ती वेळ आहे. त्यासाठी देशातूनही भाजपला पळवून लावलं पाहीजे. देशात ‘अब की बार, भाजप तडीपार’चा नारा आहे असं विधान आदित्य ठाकरेंनी केल‌. तर ‘वन हाफ’ परिवाराला ठाकरेंवर बोलण्याचा पगार मिळतो. पन्नास खोके…

Read More

मणेरी नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह..

दोडामार्ग (वा.)मणेरी येथे तिलारी नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळून आला आहे.तो मृतदेह पुरुष जातीचा असून सडलेल्या अवस्थेत आढळला.दोडामार्ग ते बांदा मार्गावर असलेल्या मणेरी पुलाजवळ तिलारी नदी पाञात शनिवारी (ता.4) दुपारी काही युवक नदी किनारी बागेत जात असताना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी शोधशोध केली असता सडलेल्या अवस्थेतेतील मृतदेह आढळून आला . दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी…

Read More

रेडी येथील स्टॉलला आग 27 हजार रुपयांचे नुकसान…

⚡वेंगुर्ले ता.०४-: रेडी माऊली मंदिर जवळ प्लॅस्टिक ताडपत्रीने साकारलेल्या देवीचे ओटीसाठी सामान विक्रीचा स्टॉलला अचानक आग लागून सुमारे २७ हजार रूपयांचे नुकसातन झाले. या प्रकरणी स्टॉलचे मालक रेडी नागोळेवाडी येथील श्रावण दाजी सुर्याजी यांनी वेंगुर्लेत पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार जळीत म्हणून नोंद झाली आहे. रेडी नागोळेवाडी येथील श्रावण दाजी सुर्याजी यांचे माऊली मंदिर नजीकच्या स्टॉलला दि….

Read More
You cannot copy content of this page