निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याची पार्श्वभूमी; तालुक्याचा घेतला आढावा..
⚡सावंतवाडी ता ०१-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना वेंगुर्ला भाजप तालुका निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल वेंगुर्ला भाजपच्या वतीने शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.परब यांनी वेंगुर्ला तालुक्याचा घेतला आढावा.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , किसान मोर्चाचे प्रफुल्ल प्रभु , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , मारुती दोडशानट्टी , सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे , कौस्तुभ प्रभु, विन्सेंट फर्नांडिस आदी उपस्थित होते.
