अतुल काळसेकर यांची टीका: महाराष्ट्राची जनता हा माज नक्कीच मोडेल
ओरोस ता १-:मुस्लिम आणि ख्रिश्चन कम्युनिटच्या जोरावर उद्धव ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत. सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. उद्धव ठाकरे 2019 नंतर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा प्लॅन केला होता. पण, ते संपले नाहीत, तुम्ही मात्र संपलात. हा खूनशीपणा सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे. मुघलांना जसे सगळीकडे संताजी, धनाजी दिसायचे तसेच उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला आहे.
ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना संपविण्याचा भाषा जाहीरपणे केली होती. या टीकेमुळे भाजपात संताप व्यक्त होत आहे. तसेच तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष काळसेकर यांनीही जोरदार पलटवार ठाकरे यांच्यावर केला आहे. याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकार त्यांनी, देवेंद्र फडणवीस यांना संपवायची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकसभेत मिळालेल्या रंडक्या यशाचा आलेला माज आहे.
महाराष्ट्राची जनता हा माज नक्की मोडेल. अशा धमक्यांना कोणीही घाबरत नाही. ज्या मुस्लिमांच्या मतावर तुम्ही राजकारण करत आहात. राज्यातील 90 टक्के हिंदू उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. तुम्ही अडीच वर्षात काय केलं याचा सगळा हिशोब जनतेकडे आहे. योग्य वेळी जनता धडा शिकवेल, असे सांगत कोकण विभागात प्रत्येक मंडळात उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षात केलेल्या गैरकारभाराचा पर्दाफाश जनतेसमोर करणार असाही इशारा काळसेकर यांनी दिला आहे.
फोटो:- अतुल काळसेकर
