विशाल परब:वेंगुर्ला येथील दोन्ही कर्मचाऱ्यांच्या घरी भेट देत वीज कर्मचाऱ्याच्या उपचारासाठी दिला आर्थिक मदतीचा हात..
⚡वेंगुर्ला ता.०१-: जनतेच्या घरातला अंधार दूर व्हावा, यासाठी कंत्राटी वीज कर्मचारी वाऱ्यापावसाची पर्वा न करता धाव घेत असतात. अशावेळी झालेल्या अपघातात त्यांना योग्य ते सहकार्य विद्युत विभागाकडून होत नाही. मात्र, काहीही असले तरी यासाठी धडपडणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या संकटात त्यांच्या व कुटुंबीयांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी समाज म्हणून आपण सर्वांनी पुढे सरसावत घ्यायला हवी, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी व्यक्त केले आहे.
दोन दिवसांपूर्वी वेंगुर्ले महावितरण उपविभाग मधील कंत्राटी कर्मचारी असलेले संदेश सत्यवान शिरोडकर आणि बाळा शंभा गावडे हे कर्मचारी विद्युत पुरवठा करण्यासाठी आपल्या दुचाकीवरून जात असताना रुग्णवाहिकेची धडक बसून अपघात झाला. त्यात बाळा गावडे हे कर्मचारी तत्काळ मृत झाले तर गंभीररित्या जखमी झालेल्या संदेश शिरोडकर यांना पुढील उपचारासाठी बांबूळी गोवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे.
