मनचे येथे एक दिवसीय शेततलाव व्यवस्थापन मोहीम…

⚡वैभववाडी ता.०१-: श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सांगुळवाडी अंतर्गत कृषिदुत (मनचे) तर्फे पाणी व्यवस्थापन मोहीम मनचे या गावात आयोजित करण्यात आला. सदर मोहिमेत सरपंच दिपक तोरसकर , गुरुनाथ मिस्त्री , तेजस घाडी तसेच इतर शेतकरी यांनी उपस्थिती दर्शवली

ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीदुत तन्मय भाऊ लकडे ,आकाश शिंदे , प्रविण पाटील , सुशांतदादा नागरगोजे, लोहिथ रॉयल, उप्परा विनय, यांनी पाणी व्यवस्थापनाची माहिती सांगून ती करून दाखवली. सोबत पाणी व्यवस्थापन करणे हे का महत्त्वाचे आहे याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच कॉलेज चे प्राचार्य डॉ. स्वप्निल होळकर सर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला . सोबत उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी कृषीदुतांचे भरभरून कौतुक केले.

You cannot copy content of this page