पाट हायस्कूल येथे कांदळवन जनजागृती कार्यक्रम…

कुडाळ : जागतिक कांदळवन दिनाच्या निमीत्ताने कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने पाट हायस्कूल आणि डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाट येथे “कांदळवन संवर्धन आणि जनजागृति विषयक” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कांदळवन विषयी उपयुक्त माहिती विद्यार्थ्यंना देण्यात आली.


या कार्यक्रमाला मुख्याध्यापक राजन हंजनकर, कलशिक्षक संदीप साळसकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कांदळवन कक्षाचे वनरक्षक (कांदळवन कक्ष) दत्ता मुकाडे, उपजीविका तज्ञ केदार पालव, प्रकल्प समन्वयक जागृती गवंडे, दिगंबर तोरस्कर, निरज कोरगांवकर, शुभम कांबळे, ओमसाई निसर्ग पर्यटन बचत गटाचे सदस्य सौ. मनाली आरोलकर व उत्तमा आरोलकर उपस्थित होत्या. महाविद्यालयातील विज्ञान अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमात कांदळवन कक्ष अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या निसर्ग पर्यटन प्रकल्पातील ओम साई बचत गटाच्या अध्यक्ष सौ. मनाली आरोलकर यांनी कांदळवनाचे महत्व व धोके तसेच कांदळवनातील शाश्वत पर्यटन बद्दल माहिती सर्व मुलांना दिली.
कांदळवन कक्षचे प्रकल्प समन्वयक जागृती गवंडे यांनी विद्यार्थ्यास कांदळवनांची ओळख, कांदळवनात आढळणारी जैवविविधता, सागरी जैवविविधता आणि त्याचा संरक्षण करण्यासाठी कांदळवन कक्षा कडून राबविल्या जाणाऱ्या योजनांना बाबत माहिती दिली. कांदळवन कक्षचे प्रकल्प समन्वयक दिगंबर तोरस्कर यांनी सागरी वन्यजीव मासेमारीच्या जाळ्यात अडकल्यास, जाळे कापून त्यांना सोडल्याबद्दल मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या भरपाईची योजने बाबत माहिती दिली.
वनरक्षक दत्ता मुकाडे यांनी कांदळवनाचे नियम व कायदे याबद्दल माहिती दिली. तसेच Mangrove suraksha mobile app बद्दल माहिती दिली. हरितसेना प्रमुख संदीप साळसकर व सयाजी बोंदर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणातील बदल व संरक्षण यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ७५ विद्यार्थी उपस्थित होते. खाडी क्षेत्रातील कांदळवन परिसरातील शेकडो विद्यार्थी शाळेत येतात त्यांना कांदळवन रक्षण विषयक नियम पर्यटन व्यवसाय मत्स्यशेती औषधी उपयोग या बाबत जागृती होण्यास मदत होईल.

You cannot copy content of this page