Headlines

Global Maharashtra Breaking News

शेतकरी अाक्रमक, सावडाव धरणाचे काम पाडले बंद…

⚡कणकवली ता.१६-: फोंडाघाट मृद व जलसंधारण विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडून सावडाव धरणाचे काम सुरु आहे . सदर काम शेतक-यांना जमीन भुसंपादनाचा मोबदला न देताच केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत काम सुरु केले. धरणग्रस्त शेतक-यांनी गुरुवारी थेट धरण परिसरात जावून ठेकेदाराला जाब विचारत काम बंद पाडले. वडीलोपार्जित असलेल्या आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर दांडगाईने ठेकेदाराने काम सुरु केले आहे….

Read More

पन्नास फुट टाकीवर चढत विलास जाधव यांचे अनियमित पाणीपुरवठय़ावर वेधले लक्ष…

समाज मंदिर परिसरातील घटना: जोपर्यंत टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही; पालिका प्रशासनाला दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१६-: शहरातील समाजमंदिर परिसरात वारंवार अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं माजी नगरसेवक विलास जाधव यांनी थेट सुमारे पन्नास फूट उंचीच्या टाकीवर चढत निषेध व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधून देखील नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचं त्यांचे म्हणणे आहे….

Read More

आंबोली घाटात आयशर ट्रक व टेम्पोमध्ये अपघात…

कोणालाही दुखापत नाही; ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡आंबोली ता.१६-: येथील घाटातील धोकादायक वळणावर आयशर ट्रक व टेम्पो यांच्यात अपघात झाल आहे. सुदेवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी आयशर ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी आंबोली दूरक्षेत्रावरील पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन वाहतूक सुरळीत केली.

Read More

कणकवली अवकाळी पावसाची हजेरी…

ठिकठिकाणी पडझडीच्या घटना : अनेक गावांमधील विद्युत पुरवठाही खंडित.. ⚡कणकवली ता.१६-: तालुक्यात दुपारच्या सत्रात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पावसामुळे अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.हळवल गावात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते. याच गावात काही ठिकाणी शेत घर व शेती पंचावरील छप्पर उडून…

Read More

खारेपाटणमधील नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद…

कणकवली : भगवान गौतमबुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबसाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त बौद्ध सेवा संघाच्या खारेपाटण विभागातर्फे खारेपाटण-पंचशीलनगर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याचा 50 जणांनी लाभ घेतला.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत कांबळे, डॉ. सिद्धार्थ तांबे, अशोक कांबळे, पत्रकार संतोष पाटणकर, संदीप पाटणकर, मनोज पाटणकर,…

Read More

गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी…

⚡कणकवली ता.१६-: शिवशौर्य प्रतिष्ठान व कोकण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ गगनगडाचेे ट्रस्टी संजयसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उभारण्यात आला. यावेळी दिगंबर राऊत, अजित कुडकर, प्रसाद भोई, गणेश माने, साई इंगळे, सुजित शेंगाळे, साक्षी इंगळे, अमामिका भगत, प्रवीण शेंगाळे, दशरथ इंगळे, देविदास शेंगाळे यांच्यासह दुर्गसेवक, धारकरी बंधू, रणरागिणी,…

Read More

आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध…

विशाल परब: शतक महोत्सवाचे शानदार उद्घाटन.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: गावचा सर्वांगीण विकास खऱ्या अर्थाने गावात किती सोयी सुविधा उपलब्ध आहेत यावर अवलंबून आहे. गावात पायाभूत सुविधांचा असलेला अभाव दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. असा विश्वास युवा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केले. दरम्यान आसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद…

Read More

दाणोली समर्थ साटम महाराज मंदिरात दत्तयाग कार्यक्रम…

१७ व १८ मे ला आयोजन ; मुंबई केळवा रोड सेवाश्रमाचा पुढाकार.. सावंतवाडी ता.१६-: मुंबई केळवा रोड येथील श्री समर्थ साटम महाराज सेवाश्रम यांच्यावतीने शुक्रवारी १७ व १८ मे रोजी दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात श्री दत्तयागाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त समाधी मंदिरात शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता संकल्प, गणेश पूजन, त्यानंतर दहा हजार जप…

Read More

दत्तप्रसाद मयेकर यांचे निधन…

⚡कणकवली ता.१६-: वागदे आर्यादुर्गा मंदिरनजीक राहणारे दत्तप्रसाद उर्फ बंड्या विष्णू मयेकर (वय 55) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवार 16 मे रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत शांत, मनमिळाऊ असलेल्या दत्तप्रसाद यांचे कणकवली तहसील कार्यालयानजीक भवानी झेरॉक्स व डीटीपी टायपिंगचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना छातीत दुखू लागल्याने एका खाजगी…

Read More

श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.१६-: श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथे १९८७/८८ मध्ये दहावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजार ५५५ रुपयांची देणगी तसेच स्मरणिकेसाठी २० हजार रुपयांची देणगी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.विद्यालयात सन १९८८ शालान्त परीक्षेतील माजी विद्यार्थी ३५ वर्षानी एकत्र आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार…

Read More
You cannot copy content of this page