खा. राणे, मंत्री चव्हाण यांना
निरवडे सरपंचांनी दिले निवेदन
⚡सावंतवाडी ता.१०-: निरवडे भंडारवाडी येथील कोकण रेल्वे मार्गावर वरून ये जा करण्यासाठी बॉक्सवेल किंवा ओव्हर ब्रिज साठी मंजुरी देण्यात यावी,अशी मागणी खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्यांच्याकडे निरवडे सरपंच सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी केली आहे.
दरम्यान यासाठी आवश्यक असणारा निधी निश्चितच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन श्री चव्हाण यांनी सरपंचांना दिले.
याबाबत मागणीचे निवेदन श्री राणे व श्री चव्हाण यांना देण्यात आले आहे त्यात असे म्हटले आहे की निरवडे येथील भंडारवाडी येथून कोंकण रेल्वे मार्गाच्या अलीकडे व पलीकडे शेतकर्यांची शेती असल्याने नियमित जाणे येणे, तसेच गुरे ने आण करणे गरजेचे असते.रुळांच्या अलिकडे पलिकडे वाडोवस्ती आहे. आतापर्यंत या मार्गावर अनेकांची जनावरे व लोकांचे बळी गेलेले आहेत.त्यामुळे या ठिकाणी ये जा करणे करीता बॉक्सवेल किंवा ओव्हर ब्रीज होणे अंत्यत आवश्यक आहे. त्यामुळे त्याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान नक्कीच याला मंजुरी देऊ असे आश्वासन पालकमंत्री श्री चव्हाण यांनी दिले
