आंबोली मुळवंदवाडी येथील युवकाचे आकस्मित निधन…

आंबोली,ता.१०:येथील मूळवंदवाडी येथील श्याम प्रभाकर सावंत (वय २६) याचे कावीळ ने अकस्मित निधन झाले. तो गोव्यात कामाला होता.आंबोली ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर सावंत यांचा तो मुलगा होय. स्वभावाने मनमिळावू आणि खेळकर वृत्तीचा होता त्यामुळे मित्रपरिवारात तो प्रिय होता. गत वर्षीच त्याचा विवाह झाला होता. आज गोवा येथे त्याचे हॉस्पिटल मध्ये निधन झाले.आंबोलीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पच्छात एक जुळा भाऊ राम,वडील,आई,पत्नी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page