इन्सुली बिलेवाडी येथे एसटी व दुचाकी मध्ये अपघात…

दुचाकीस्वार जखमी: बस चालकावर बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

बांदा/प्रतिनिधी
इन्सुली पागावाडी बांदा मार्गावरील इन्सुली बिलेवाडी येथे एसटी आणि दुचाकी मध्ये अपघात झाला. अरुंद रस्ता व रस्त्यावर आलेल्या झाडीमुळे सदरचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार लतिका रमाकांत सावंत (वय 27, रा. इन्सुली बिलेवाडी ) हिच्या पायाला दुखापत झाली. या अपघाता बाबत दुचाकीस्वार लतिका सावंत हिने दिलेल्या तक्रारीनुसार बस चालक आनंद आत्माराम मढावी( वय.३८) यांच्यावर बांदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा अपघात शुक्रवारी सकाळी झाला.


याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावंतवाडी डेपोची सावंतवाडी पागावाडी बस (एमएच २०बीसि२६७४) नेहमीप्रमाणे पागावाडी येथून बिलेवाडी येथे जात होती दरम्यान बिलेवाडी येथे बस आली असता समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला(एमएच07 एएफ 9236) बसने धडक दिली ही धडक एवढी मोठी होती की यात दुचाकीने जाणारी युवती बस खाली आली सुदैवाने तिला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. मात्र तिच्या दुचाकीचे फार मोठे नुकसान झाले. अपघात नंतर स्थानिकांनी जखमी युवतीला सावंतवाडी येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल केले मात्र तेथे अस्थीरोगतज्ञ नसल्याने तेथून खाजगी रुग्णालयात हलविले.
अपघाताची माहिती बांदा पोलिसांना घटनास्थळी जात पंचनामा केला दुचाकीस्वार लतिका सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.
फोटो :-
इन्सुली येथे अपघातग्रस्त वाहने.

You cannot copy content of this page