भाजपची उद्या सिंधुदुर्गात संविधान “जागर यात्रा”…

कणकवलीत आ राणे यांच्या उपस्थितीत होणार प्रारंभ:जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांची माहिती..

⚡सावंतवाडी ता.१०-: सविधान अमृत महोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे उद्या संविधान “जागर यात्रा” चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी आज येथे दिली. दरम्यान या यात्रेला सावंतवाडी मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून सकाळी १० वाजता आ नितेश राणे यांच्या माध्यमातून या सभेला सुरुवात होणार आहे. या सभेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असे श्री जाधव यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात संविधान गौरव दिनानिमित्त संविधान अमृत महोत्सव सुरू आहे. हे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशभरात सुरू आहे. या माध्यमातून लोकांना संविधानाबाबत माहिती पटवून देत एक प्रकारे बौद्ध समाजाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असल्याचे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी रवी मडगावकर ,परीक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page