Global Maharashtra Breaking News

तोंडवळी तळाशील येथे खाडीकिनारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…

वाळू उपशाबाबत महिला व ग्रामस्थ आक्रमक :एस्टीमेट तयार करून काम मार्गी लावण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन.. ⚡मालवण ता.१५-: तोडवळी-तळाशिल येथील वाळू उपसा बंद करणे, वाळू उपशामुळे गावाची झालेली धूप भरून काढणे, किनाऱ्यावर भराव टाकणे व बंधारा बांधणे अशा मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला १५ दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने तोंडवळी तळाशील येथील पुन्हा एकदा…

Read More

मळेवाड देऊळवाडी येथील खेमराज पुलाच्या नूतन बांधकामच संजू परब यांच्या शुभहस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१५-: मळेवाड देऊळवाडी येथील खेमराज पुलाच्या नूतन बांधकाम कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाळून करण्यात आला. मळेवाड देऊळवाडी येथील मार्गावर असलेल्या नदीवर 1942 साली ऐक्य वर्धक संस्था मळेवाड या संस्थेने ग्रामस्थांच्या मदतीने पूल उभारला होता.खूप जुना पूल असल्याने व तो वाहतुकीसाठी अरुंद असल्याने या ठिकाणी नव्याने पूल व्हावा अशी गेली…

Read More

स्व.प्रा.मिलिंद भोसले, कै. अँड.दीपक नेवगींच्या स्मृतींचा जागर…

कोमसाप’तर्फे सतिश पाटणकर, संजय कात्रेंना पुरस्कार प्रदान:साहित्यिकांनी आपला धर्म सोडू नये : विकास सावंत.. ⚡सावंतवाडी ता.१५-: साहित्यिकांच्या हत्या करण्यापर्यंत लोक पोहचलेत. साहित्यिकांनी असं काय केलं की ही वेळ त्यांच्यावर यावी, त्यांना संरक्षणात रहावं लागावं. त्यांनी केवळ आपल्या भावना व्यक्त केल्यात. परंतू, त्यांच लिखाण एवढं का झोंबाव ? की समोरच्या माणसालाच ठार माराव. अशान माणूस मरेल…

Read More

काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो १० रुपये अनुदान हा ऐतिहासीक निर्णय…

प्रमोद जठार यांनी मानले आभार;हे यश म्हणजे शेतकऱ्यांचा विजय.. ⚡कणकवली ता.१५-: काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने प्रतिकिलो १० रुपये प्रमाणे २ टनापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला. यासाठी ३०० कोटींची तरतूदही करण्यात आलेली आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किला १० रुपये प्रमाणे दोन टनापर्यंत अनुदान देण्याचा झालेला निर्णय हा ऐतिहासीक निर्णय…

Read More

शिरोडा वेंगुर्ले मार्गावर बागकरवडी येथे मध्यरात्री अपघात…

22 वर्षीय युवकाचा मृत्यू:कामावरून घरी परतत असताना दुर्घटना.. ⚡वेंगुर्ले ता.१५-:शिरोडा वेंगुर्ले मार्गावर बागकरवडी येथे मध्यरात्री गोवा येथून कामावरून न्हैचीआड येथे घरी येत असणाऱ्या 22 वर्षीय युवकाच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्या युवकाचा मृत्यू झाला आहे. सागरतीर्थ टाक (बागकरवाडी) येथे मोटरसायकलच्या अपघातात वेंगुर्ला नैचिआड येथील संकेत किशोर पेडणेकर (वय-२५) हा तरुण जागीच ठार झाला. संकेत…

Read More

सावंतवाडी- दोडामार्ग- वेंगुर्ला शहर विकासासाठी नऊ कोटी…

बाबु कुडतरकर ; शिंदेसेना पदाधिकारी, नगरसेवकांकडून मंत्री केसरकरांचे आभार ⚡सावंतवाडी ता.१५-: दोडामार्ग -वेंगुर्ले शहर विकासासाठी नऊ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.याबाबतची माहिती शिंदे गटाचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान याबाबत शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे लक्ष वेधले होते.हा निधी उपलब्ध केल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे…

Read More

सिंधुदुर्गातील ३० दशावतारांच्या मंडळांना साहित्यासह वाहन खरेदीसाठी अनुदान मिळणार…

रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश:मंत्री दीपक केसरकर व किरण सामंत यांचे विशेष प्रयत्न.. कुडाळ, प्रतिनिधी-: शिवसेना नेते तथा सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत, राज्याचे शिक्षणमंत्री तथा सिंधुरत्न समिती अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० दशावतार मंडळांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून साहित्य तसेच वाहन खरेदीसाठी अनुदान मंजूर केले आहे. सिंधुरत्न समिती संचालक…

Read More

ठाकरे शिवसेनेच्या वतीने प.पू.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक…

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य:पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत बाबांच्या चरणी साकडे.. ⚡कणकवली ता.१५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक करण्यात आला. विनायक राऊत यांना दीर्घायुष्य लाभो व ते पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत,…

Read More

माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बेटी बचाव’ समुह नृत्य लक्षवेधी…

⚡सावंतवाडी ता.१५:माजगाव ग्रामसंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात माजगाव शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘बेटी बचाव’ समुह नृत्य लक्षवेधी ठरले. शाळेच्या या नृत्याने प्रबोधनासह मनोरंजन केल्याने या महिला मेळाव्यातील उपस्थित महिला बेहद खुश झाल्या. त्यामुळे शाळेच्या या समुह नृत्याचे माजगाव परिसरातून कौतुक होत आहे.

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शनिवारी पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन…

⚡पुणे :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवारी (दि.१६) चिंचवड (पुणे) येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन आयोजित करण्यात असून परिसंवाद तसेच पत्रकार गौरव समारंभ आयोजित केल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्‍वास आरोटे यांनी दिली. शनिवारी सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते व छत्रपती संभाजी राजे, भाजपचे महामंत्री आ. श्रीकांत भारतीय यांचे उपस्थितीत उद्घाटन…

Read More
You cannot copy content of this page