आंदोलनाचा देवगड आगारावर कोणताही परिणाम नाही…

कामगारांच्या वतीने कोणत्याही निदर्शने अथवा आंदोलन नाही…

⚡देवगड ता.०३-: महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृषी समितीच्या वतीने मंगळवार ३ सप्टेंबर पासून धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.या धरणे आंदोलनात राज्य परिवहन
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन देखील करण्यात आले होते.
या आंदोलनाचा देवगड आगारावर कोणताही परिणाम न होता देवगड आगारातून मंगळवारी सकाळपासून सुटणाऱ्या सर्व फेऱ्या या आगारातून बाहेर पडल्या कोणत्याही प्रकारच्या निदर्शने
अथवा आंदोलन कामगारांच्या वतीने करण्यात आले नाही.
परंतु कोकणात येणाऱ्या मुंबईकर
चाकरमाण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन मुंबई येथून करण्यात आले आहे. त्याकरता आवश्यक असणाऱ्या गाड्या या राज्यातील
ठिकठिकाणच्या आगारातून मुंबईकडे रवाना करण्यात आले असून त्यानुसार देवगड आगारातून सुमारे २० गाड्या मुंबईकडे रवाना झाल्याने देवगड आगारातील सुमारे लांब पल्ल्या बरोबर ग्रामीण भागातील सुमारे १० ते १२ प्रवासी फेऱ्या बंद ठेवावा लागल्या आहेत.
त्याचप्रमाणे काही प्रवासी फेऱ्या सुरू असतानाही एक ते दोन तास विलंबाने नियोजित मार्गावर रवाना झाले यामुळे प्रवासी वर्गाबरोबर विद्यार्थी वर्गांची फार
मोठी गैरसोय निर्माण झाल्याने प्रवासी वर्गात राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बंद करण्यात आलेल्या प्रवासी फेऱ्यांमध्ये देवगड रत्नागिरी सकाळी ५ वाजता व सकाळी ८.३० वाजता सुटणारी प्रवासी फेरी, देवगड बेळगाव सकाळी ७.१५ व दुपारी ११.५० प्रवासी फेरी, देवगड सावंतवाडी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटे देवगड तुळजापूर सकाळी ९ वाजता, देवगड पणजी सकाळी ११.३० देवगड सांगली दुपारी १२.३० देवगड मालवण दुपारी ३.३० देवगड,बोंडकवाडी ३.४५ या लांब पल्याच्या प्रवासी फेऱ्या बरोबर ग्रामीण भागातील तांबळडेग, नरसाळेवाडी या प्रवासी फेऱ्या बंद ठेवण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page