महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या बैठकीत सूर:जिल्हाध्यक्षपदी दीपक कुडाळकर यांची निवड..
कुडाळ : कर्जदार आणि जामीनदार यांच्यावर होणाऱ्या हक्कांविरोधात आवाज उठवण्याचा काम नेहमीच महाराष्ट्र लोकाधिकार समितीने केले आहे. या कार्याचा अहवाल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सभेचे आयोजन केले असून राज्यभरात जो कायद्याचा गैरवापर करून बेकायदेशीर जप्ती वसुली केली जाते त्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम समिती करणार आहे ते मत महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. प्रसाद करंदीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र लोकाधिकार समितीची बैठक रविवारी सायंकाळी कुडाळमध्ये एमआयडीसी रेस्टहाऊस येथे झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक कुडाळकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना ऍड. प्रसाद करंदीकर म्हणाले, महाराष्ट्र लोकाधिकार समितीने गेली काही वर्षे कर्जदार आणि जामीनदार यांच्यावर अन्यायकारक जी बेकायदेशीर वसुली कारवाई होते त्याबाबतीत आवाज उठवण्याचे काम केले आहे आणि हे सर्वच पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की बांद्यामध्ये बांदा अर्बन बँकेच्या आंदोलनापासून रत्नागिरीतल्या घर वापसी आंदोलनापर्यंतच्या सगळ्या बातम्या आपण लोकांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज याचाच एकत्रीकरण करून लोकांना आपण कसे या बेकायदेशीर जप्ती वसुली कारवाई मधून वाचवू शकतो? या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याच्या आमचा प्रयत्न होता. आणि जे जे काम केलेले आहे त्याचा एक कार्य अहवाल लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवण्यासाठी आज एक बैठक आयोजित केलेली होती.
. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण राज्यांमध्ये जी बेकायदेशीर जप्ती वसुली कायद्याचा सर्रास गैरवापर करून केली जाते, त्या अनुषंगाने या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला जनजागृती करावी लागेल. वेळप्रसंगी राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेऊन कायदा बदलण्याच्या अनुषंगाने जे कायदे आहेत ते बदलण्याच्या अनुषंगाने सत्तेत असलेले लोक किंवा जे निवडून येणारे लोक आहेत त्यांना आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल की अस्तित्वात असलेले कायदे हे सर्वसामान्य कर्जदारासाठी जाचक आहेत. त्यासाठी आम्हाला आवाज उठवावा लागेल आणि आवाज आम्ही यानंतर सर्वच राज्यभर उठवणार आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही इचलकरंजीच्या मेळाव्यातून केलेली आहे. चार दिवसापूर्वीचलकरंजीतला मेळावा झाला आज इथली बैठक झाली गणपतीच्या पूर्वी रत्नागिरीत एक बैठक होईल आणि त्या माध्यमातून आपण राज्यभर हळूहळू हा सगळ्या गोष्टी लोक जनतेच्या समोर राज्यकर्त्यांच्या समोर आणि प्रशासनाच्या समोर आणणार आहोतअसे ऍड. करंदीकर म्हणाले.
फायनान्स कंपन्यांनी दमदाटी करणे हे कुठेच कायदेशीर नाही आणि हे जर बेकायदेशीरपणे दमदाटी करतील म्हणून आमची संघटना आहे. संघटना सुद्धा ज्याला जशास तसे उत्तर द्यायला सक्षम आहे. तुम्ही कायदेशीर मार्गाने आलात तर आम्ही तुमचे स्वागत करू. बेकायदेशीर काही करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र कधीही तुम्हाला सरळ सोडणार नाही. प्रत्येकाने सजग राहून पाहिले पाहिजे कि, कर्ज घेताना जे काय आपण सह्या करून देतोय त्याचा मिस युज होतोय का आणि त्याचा मिस युज करून आपल्याला कुठच्यातरी कारवाई मध्ये अडकवले जातेय का? हे प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.असे जर अडकवले जात असेल तर त्याची तक्रार दिली पाहिजे, असे आवाहन ऍड. करंदीकर यांनी केले.
या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर, प्रदेश कार्याध्यक्ष योगेश वाघमारे, प्रदेश महासचिव सादिक डोंगरकर प्रदेश समन्वयक अविनाश पराडकर सचीव कमलेश चव्हाण जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, जिल्हा संघटक राजेश माने, रौनक पटेल, समीर आचरेकर, विनायक सापळे, महेश परुळेकर, दीपक गाडी, किरण चव्हाण, विवेक नाईक, राधाकृष्ण गावंडे, राजेश, साळगावकर, रोहन नलावडे राजेंद्र पाटील, कोमल गिरकर. सीमांतिनी मयेकर, दिव्या साळगावकर, उज्वला येळाविकर, राजन पाताडे,अशोक बिरमोळे डॉ.योगिता राणे, पूजा आयरेकर, ऋतुजा मेस्त्री, पल्लवी पडवेकर प्रमोद नाईक, गोपाळ पावसकर, अस्मिता वाडोकर,जितेंद्र कासले, संजय फर्नांडिस, नील फर्नांडिस, जितेंद्र कासले इत्यादी उपस्थित होते.
