बॅ. नाथ पै फिझिओथेरेपी कॉलेजचा उपक्रम :कुडाळ शहरात रॅली आणि पथनाट्यातून प्रबोधन:रिक्षाचालक आणि बँक कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर..
⚡कुडाळ ता.०३-: बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयातर्फे जागतिक भौतिकोपचार दिनाच्या पूर्वसंध्येला कंबरदुखी ही थीम घेऊन रॅली, पथनाट्य, मोफत मार्गदर्शन व उपचार शिबिर इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आहे. विशेष म्हणजे ६ सप्टेंबर रोजी रिक्षा चालक आणि बँक कर्माचारी यांच्यासाठी कुडाळ आणि पिंगळी येथे मोफत भौतिकोप्चार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. .
दरवर्षी जगभरामध्ये ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक भौतिकोपचार दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर दिनांक 2 सप्टेंबर 2024 पासून 8 सप्टेंबर पर्यंत कुडाळ येथील बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने कंबरदुखी या थीम संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कुडाळ ग्रामीण रुग्णालयापर्यंत एका जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच याच महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कुडाळ एसटी स्टँड समोरील गांधी चौकात, जिजामाता चौकात, ग्रामीण रुग्णालय परिसरात व शिवाजीनगर येथे कंबरदुखी जनजागृती संदर्भात पथनाट्य सादर केले. यामध्ये भविष्यातील सर्जरी टाळण्यासाठी फिजिओथेरपी उपचार पद्धती किती महत्त्वाचे आहे. याचं सर्वांना प्रात्यक्षिकासह आवाहन करण्यात आले.
तसेच ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांना स्वर्गीय यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर येथे ‘कंबरदुखी’ संदर्भात मोफत मार्गदर्शन व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बॅ.नाथ पै फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे सकाळी ९ ते ५ या वेळेत आणि चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने तसेच प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होणार आहे. .
. ६ सप्टेंबर रोजी रिक्षाचालक, बँक वर्कर्स यांच्यासाठी देखील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बँक वर्कर्ससाठी बँक ऑफ इंडिया पिंगुळी येथे, तसेच बँक ऑफ बडोदा कुडाळ येथे आणि रिक्षाचालकांसाठी कुडाळ एसटी स्टँड येथे मोफत भौतिकोपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी अक्षया सामंत 97 65 92 54 09 व रश्मी सडवेलकर 95 60 74 19 97 या नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
