Headlines

Global Maharashtra Breaking News

‘‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत विविध कार्यक्रम…!

वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवडा अंतर्गत यावर्षी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे घोषवाक्य घेऊन वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छता रॅलीसह महास्वच्छता अभियान व अन्य स्पर्धांचे आयोजन केले आहे. तरी या विविध कार्यक्रमांमध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त…

Read Full News

म्हापण येथे हायमास्टचे उद्घाटन…!

⚡वेंगुर्ला ता.२२-: म्हापण ग्रामपंचायत तिठा येथे आमदार स्थानिक विकास निधी सन २०२२/२३ अंतर्गत सोलर हायमास्टचे उद्घाटन शिदे सेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच सुरेश ठाकूर, म्हापण शिवसेना विभाग प्रमुख दत्ता साळगांवकर, सागर गावडे, तालुका सचिव युवासेना, कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, म्हापणचे माजी सरपंच नाथा मडवळ, माजी…

Read Full News

प्रसिद्धी माध्यमांमध्ये फोटो येण्यासाठी टीका करणाऱ्यांनी अर्धवट माहितीच्या आधारावर बोलू नये…

मंत्री दीपक केसरकर यांचा राजन तेलींना टोला:बाबुराव धुरींची भूमिका योग्यच,तो प्रश्न देखील मी सोडवणार.. सावंतवाडी ता.२२-: जागा पाहण्या अगोदर मागणी करणे हे चुकीचे आहे.याबाबत पूर्ण माहिती न घेता केवळ माध्यमांमध्ये फोटो छापून यावे यासाठी टीका करणाऱ्यांनी याची माहिती घ्यावी, असं टोला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना नाव न घेता आज येथे…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…!

⚡कुडाळ ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी कुडाळ येथील मानाच्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले.यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान यांच्यावतीने माजी नगर सेवक राकेश कांदे यांनी श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर,सौ. प्रज्ञा ढवण,विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मौर्ये,सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, सरव्यवस्थापक के. बी. वरक, शरद सावंत,सिंधुदुर्ग राजा…

Read Full News

नाधवडे येथील शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू…!

⚡वैभववाडी ता.२१-: नाधवडे व्हेळकरवाडी येथील रमेश तुकाराम पाष्टे  वय ६४ वर्षे या शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू झाला. गोवा बांबूळी येथे उपचारदरम्यान त्यांचा  बुधवारी दिनांक 18 सप्टेंबर मृत्यू झाला.     मयत रमेश पाष्टे हे  दिनांक १७ सप्टेंबर रोजी शेतात काम करीत असताना त्यांना सर्पदंश झाला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.  मात्र त्यांची प्रकृती…

Read Full News

काजू खरेदी, नाचणी खरेदी व काजू प्रक्रियेच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी प्रमोद रावराणे यांची निवड….

वैभववाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई अंतर्गत कोकण विभागामध्ये नाचणी खरेदी, काजू खरेदी व काजू प्रक्रिया उद्योग सुरू करणे यासाठी नवीन उपसमिती गठित करण्यात आली आहे. या उपसमितीच्या अध्यक्षपदी प्रमोद पुंडलिक रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांचे होतंय सर्वत्र अभिनंदन

Read Full News

रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस दयासागर छात्रालय शाळेतील अनाथ मुलांसोबत केक कापून साजरा…

विशाल परत यांचा पुढाकार:विविध वस्तूंचे केले वाटप.. ⚡सावंतवाडी ता.२१-: रोणापाल येथील दयासागर छात्रालय या अनाथ मुलांसाठी असलेल्या शाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्यामार्फत विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळीशाळेतील अनाथ मुलांसोबत केक कापून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून…

Read Full News

सावंतवाडीच्या अस्मसा आर्ट ॲकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांचा जे.जे. ऑफ आर्ट स्कूलमध्ये समावेश…

सावंतवाडीयेथील अस्मसा आर्ट या अकॅडमीत चित्रकलेचे शिक्षण घेत असणार्‍या पाच विद्यार्थ्यांनी जे जे स्कूल ऑफ मध्ये प्रवेश मिळवला आहे.यात सलोनी संदीप कोटकर सावंतवाडी अथर्व रवींद्र आचरेकर (कुडाळ)यश बाबुराव सातर्डेकर( वेंगुर्ला )आयुष सुरेंद्र पेडणेकर (फोंडा)नितीश साबाजी करगुटकर(वेंगुर्ला) यांचा समावेश आहे.त्यांना चित्रकार सत्यम मल्हार आणि चित्रकार अक्षय सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेहे विद्यार्थी गेली २ वर्ष अस्मसा…

Read Full News

शिवपुतळा कामाचे जयदीप आपटे याला २६ लाखच मिळाले…

मंदार केणी:बाकीची रक्कम कोणाकोणाच्या खात्यावर गेली ? मालवण (प्रतिनिधी) राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम दोन कोटीहुन अधिक रकमेचे असताना या कामातून शिल्पकार जयदीप आपटेला फक्त २६ लाख रूपये मिळाल्याची कबुली त्याने पोलीस तपासात दिली आहे, याबाबतची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम आपटेच्या खात्यातून कोणाकोणाच्या खात्यावर गेली याचा तपास पोलीसांनी केला…

Read Full News

विज्ञान शाखेत असलेल्या संधीचा फायदा घेत संधीचे सोने करा-:संतोष मयेकर…

मालवण दि प्रतिनिधीसध्याच्या काळात संघर्ष हा पावला पावलावर आहे आणि त्यातून तुम्हालाच मार्ग काढायचा आहे. त्यामुळे कष्ट करण्यास मागे हटू नका, नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सध्या अनेक क्षेत्रात संधी आहेत त्याचे सोने विद्यार्थ्यांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी हायस्कुलचे माजी विद्यार्थी व नैरोबी या देशात चीफ इंजिनिअर म्हणून कार्यरत…

Read Full News

You cannot copy content of this page