विशाल परत यांचा पुढाकार:विविध वस्तूंचे केले वाटप..
⚡सावंतवाडी ता.२१-: रोणापाल येथील दयासागर छात्रालय या अनाथ मुलांसाठी असलेल्या शाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्यामार्फत विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी
शाळेतील अनाथ मुलांसोबत केक कापून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
यावेळी भाजप बुथ अध्यक्ष श्री.सागर गोठस्कर , दयासागर छात्रालय शाळेचे व्यवस्थापक ञिवबा वीर, समाजसेविका श्रीमती मंगल कामत, श्रीमती रत्नप्रभा केळूसकर, रोणापाल ग्रामस्थ निल गावडे, पारदेश परब यांच्यासह शाळेतील मुले उपस्थित होती…
