प्रसिद्धी माध्यमांमध्ये फोटो येण्यासाठी टीका करणाऱ्यांनी अर्धवट माहितीच्या आधारावर बोलू नये…

मंत्री दीपक केसरकर यांचा राजन तेलींना टोला:बाबुराव धुरींची भूमिका योग्यच,तो प्रश्न देखील मी सोडवणार..

सावंतवाडी ता.२२-: जागा पाहण्या अगोदर मागणी करणे हे चुकीचे आहे.याबाबत पूर्ण माहिती न घेता केवळ माध्यमांमध्ये फोटो छापून यावे यासाठी टीका करणाऱ्यांनी याची माहिती घ्यावी, असं टोला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना नाव न घेता आज येथे लगावला.दरम्यान आंबोली गेळे या जमिनीच्या वाटपाचा प्रश्न जवळपास संपुष्टात आला आहे आता चौ कुळ या गावाच्या जमीन वाटपाचा प्रश्नही निकाली काढला आहे तिन्ही गावच्या जमिनीत वाटपाबाबत आचारसंहितेपूर्वी कार्यवाही केली जाणार आहे. आंबोली येथील वहिवाटीच्या जमिनी वाटपाबाबत स्थानिक कमिटीला निर्णय देण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच हा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा देखील श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री केसरकर पुढे बोलताना म्हणाले आडाळी एमआयडीसी मध्ये नवीन कंपनीने येण्याची इच्छा दर्शवली आहे अल्युमिनियमचे टिन तयार करणारी ही कंपनी असून लवकरच उद्योग मंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी कंपनीचे उद्घाटन केले जाणार आहे त्यामुळे केवळ माध्यमांमध्ये करुन आरोप करणाऱ्यांनी ही त्या ठिकाणी उद्घाटनास यावे असा टोला मंत्री केसरकर यांनी माजी आमदार राजन तेली यांना नाव न घेता लगावला.

दरम्यान ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी घेतलेली भूमिका ही योग्यच असून स्थानिकांचा प्रश्न हा स्थानिकांनीच सोडवावा, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील आंदोलन करणे हा केवळ फार्स असून मी सासोलीवासीयां सोबत सदैव आहे.तो देखील मी प्रश्र सोडवणार आहे. असंही श्री केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी म्हटलेल्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. याबाबत त्यांनाच विचारल तर अधिक योग्य ठरेल. ते लॅंडमाफीया कोण ? हे त्यांनाच विचाराव. त्या लॅंडमाफीयाची माहीती मला नाही. संजू परब यांना त्या लॅंडमाफीयाचे फोटो प्रसिद्ध करायला सांगावेत. ऑलरेडी प्रसिद्ध झालेले असतील तर लोकांना दाखवावेत असे ही केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page