Headlines

Global Maharashtra Breaking News

आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर..

कणकवली : आज भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ९९ जागांची उमेदवारी देखील जाहिर करण्यात आली आहे. तर या ९९ जागांच्या पहिल्या यादीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Read Full News

राजन तेली उबाठा शिवसेनेत गेल्यावर संजू परब यांनी घेतली प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक…

बैठकीला बांदा दशक्रोशीतून प्रमुख कार्यकर्त्यांची लक्षनीय उपस्थिती:कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून संजू परब भावनाविवश, सदैव सोबत राहण्याचे कार्यकर्त्यांचे वचन.. सावंतवाडी -: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना उगाठा मध्ये प्रवेश केल्याने वर भाजपचे कार्यकर्ते भाजप सोबतच आहेत हे दाखविण्यासाठी भाजपचे नेते व प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी बांदा दशक्रोशीच्या प्रमुख…

Read Full News

माणसातला देवमाणूस आमदार नितेश राणे…

बावशीच्या दिव्यांग सचिन सावंतचे कृत्रिम पाय बसवण्याचे स्वप्न पूर्ण.. ⚡कणकवली ता.२०- : नांदगाव येथे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या सचिन सावंत या तरुणाच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याच्या उद्देशाने आमदार नितेश राणे यांनी मदतीचा हात दिला. दोन्ही पायांवर नवे कृत्रिम पाय लागताच तो आधाराविना सर्वसामान्यांसारखे चालू लागला.. आमदार नितेश राणे यांनी यासाठी संपूर्ण आर्थिक भार उचलला…..

Read Full News

सावंतवाडी शहरात पोलिस संचलन…!

⚡सावंतवाडी ता.२०-: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सावंतवाडी शहरात पोलिस संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. यात दोन पोलीस निरीक्षक सात पोलीस उपनिरीक्षक आणि ४० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Read Full News

मळगाव येथील शारदा विद्यालय आता सीसीटीव्ही नियंत्रणाखाली…

सुभाष नाटेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांतर्फे शाळेस सीसीटीव्ही कॅमेरा भेट.. ⚡सावंतवाडी ता.२० सहदेव राऊळ-: मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता ही जिल्हा परिषद शाळा आता सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आली असून या शाळेस मळगाव रस्तावाडी येथील रहिवासी शाळेचे माजी विद्यार्थी सुभाष नाटेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरा भेट देण्यात आला.मान्यवरांच्या उपस्थितीत नाटेकर यांच्या…

Read Full News

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी बांदा पोलिसांची मोठी कारवाई…

पाचशेहून अधिक दारूचे खोके: चालकाला घेतले ताब्यात.. बांदा/प्रतिनिधीबांदा पोलिसांनी आज दुपारी बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई केली. कॅन्टर मधून वाहतूक करण्यात येणारे तब्बल ५०० हून अधिक दारूचे खोके जप्त करण्यात आले आहे. मुद्देमालाची मोजदाद सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली आहे. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई निरीक्षक बडवे यांच्या…

Read Full News

माझ्या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केल्याबद्दल आभार…

राजन तेली: केसरकरांचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया.. ⚡सावंतवाडी ता २०-: आपण घेतलेल्या भूमिकेचे सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केल्याने मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मिशन हे दीपक केसरकर यांना पराभूत करणे हेच असून, त्यासाठी एकत्र येऊन काम करूया असे आवाहन शिवसेना ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनी…

Read Full News

परशुराम उपरकर स्वगृही परतणार…

दुपारी घेणार “मशाल” हाती: मातोश्रीवर पक्षप्रवेश.. ⚡कणकवली ता.२०-: माजी आमदार परशुराम उपरकर अखेर आज स्वगृही परतत असून, आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधणार आहेत. मनसे मधून बाहेर पडल्यानंतर ते कोणत्या निर्णय घेणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली होती. अखेर आज ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार…

Read Full News

बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या कारची वाहतूक पोलिसासह स्टॉल व दुचाकीला धडक देत पलायन…

बांदा/प्रतिनिधीबेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या मोटारिचा पाठलाग करणारा वाहतूक पोलिस राजा राणे यांच्या अंगावर गाडी घालत भर बाजारपेठेतील स्टॉल व दुचाकीला धडक देत मोटार चालकाने पलायन केले. यासाठी मोटार चालकाने तब्बल अर्धा किलोमीटर थरारक रिवर्स गाडी चालविली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कॅमेरे बंद असल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत.ही घटना बांदेश्वर मंदिर नाका येथे सायंकाळी उशिरा…

Read Full News

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांचे संचालन…

कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरामध्ये शनिवारी सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. यामध्ये कुडाळ पोलिसांसोबत केंद्रीय राखीव पोलीस दल सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. कणकवली पोलीस ठाण्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान व पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. शनिवारी सायंकाळी कणकवली पोलीस…

Read Full News

You cannot copy content of this page