Global Maharashtra Breaking News

पोहण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू…

देवगड तालुक्यातील तळवडे येथील घटना.. देवगड (प्रतिनिधी) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील तळवडे घाडीवाडी येथील जयदीप पांडुरंग घाडी (वय २३ राहणार तळवडे घाडीवाडी)हा आपल्या चार मित्रांसोबत गुरुवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास तळवडे झाजमतर खाडीतुन वाणीवडे येथे पोहत जात होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील तीनजण बुडू लागले. बुडताना त्यांनी आरडाओरड केल्यामुळे खाडीकिनारी मच्छीमार करण्यासाठी…

Read More

सावंतवाडी शहरात अनेक प्रभागात गढूळ पाणी…

लोकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळला तर गप्प बसणार नाही; महेश पांचाळ यांचा पालिका प्रशासनाला इशारा .. ⚡सावंतवाडी ता.१०-: शहरात अनेक प्रभागात पुरवठा होणारे पाणी पुन्हा गढूळ येत आहे. गेले ८ ते १० दिवस हा प्रकार सुरू आहे. याबाबतची माहिती भाजपचे य कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी दिली. याबाबत वारंवार पालिका प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत…

Read More

शिरोडा रेडी पुला जवळ तिलारी पाणी योजनेची पाईप लाईन फुटली…

हजारो लिटर पाणी वाया:मे महिना असल्याने पाण्याची मोठी गरज भासते.. ⚡वेंगुर्ले ता.१०-: शिरोडा रेडी जोडणाऱ्या पुल जवळ आज दुपारी तिलारी पाणी योजनेची पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.या प्रकाराबाबत संबंधित विभागाला शिरोडा ग्रामस्थांकडून कळविण्यात आले आहे. सध्या मे महिना असल्याने पाण्याची मोठी गरज भासत आहे. शिरोडा गावात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे काम…

Read More

पालघर लोकसभा मतदारसंघाचे सहनिरीक्षक म्हणून आमदार नीतेश राणे यांची नियुक्ती…

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती.. ⚡कणकवली ता.१०-: कणकवली,देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे.आमदार नितेश राणे याची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत…

Read More

रेडियम कटरने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर…

⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील गौतम हिंदळेकर याच्यावर पूर्ववैमनस्यातून कटरने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहरातील माऊलीनगर येथील महेंद्र गोपाळ चव्हाण याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. १० फेब्रुवारी २०२४ रोजी…

Read More

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना…

⚡मालवण ता.१०-:गेल्या काही वर्षांमध्ये व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस सापडण्याचे प्रकार वाढले असून त्याच्या कथित तस्करीबद्दल मच्छिमार तसेच किनारपट्टीतल्या भागातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. व्हेल माशाच्या उलटी संदर्भात प्रशासन, मच्छिमार आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात समज गैरसमज असून आजही व्हेल माशाची उलटी बाबत सत्यता तपासणारी यंत्रणा नाही किंवा त्या यंत्रणेला मर्यादा आहेत. यामुळे कायद्याचा दुरुपयोग,…

Read More

झाराप येथे दर्ग्याला उपस्थित राहून शिंदे शिवसेनेने दिला मुस्लिम बांधवांना शुभेच्छा…

⚡कुडाळ ता.१०-: झाराप येथील मज्जिद मध्ये दर्गा कार्यक्रमानिमित्त शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम समाज बांधवांसमवेत दर्गा कार्यक्रमास उपस्थित राहून मुस्लिम समाज बांधवांचा आनंद द्विगुणित केला. दरम्यान मुस्लिम समाज बांधवांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. यशवर्धन राणे,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री.सर्वेश पावसकर,शिवसेना अल्पसंख्याक तालुका संघटक श्री.बाबू खान उर्फ शेरखान यांचे आभार व्यक्त केले….

Read More

खोदाईमुळे दुर्दशा झालेल्या तारकर्ली रस्त्याची डागडुजी व्हावी…

अन्यथा आमरण उपोषणास बसणार :सुरेश बापर्डेकर यांचा इशारा. ⚡मालवण ता.१०-: नौदल दिन कार्यक्रमावेळी डांबरीकरण व सुस्थितीत केलेल्या तारकर्ली येथील रस्त्याच्या दुतर्फा जलजीवन मिशनच्या कामासाठी खोदाई करण्यात आल्या आल्यानंतर चार महिने उलटले तरी त्याठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. तारकर्ली हे पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना हा खोदाई केलेला रस्ता येत्या पंधरा…

Read More

दळवी घराण्याचा १४ रोजी आंबडोस व्हाळवाडी येथे गोंधळ…

⚡ओरोस ता. ०९-: क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याचा गोंधळ उत्सव १४ मे रोजी मालवण तालुक्यातील आंबडोस व्हाळवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याची आकार भवानी आंबडोस व्हाळवाडी येथील दळवी घरात वास्तव्यास आहे. तिचा गोंधळ उत्सव दळवी भावकी आयोजित…

Read More

केसरी धनगरवाडीत कमी दाबाचा वीज पुरवठा…

नवीन टान्सफार्मर कार्यान्वित करा ; उपसरपंच संदीप पाटील यांची मागणी. ⚡सावंतवाडी ता.०९-: केसरी – धनगरवाडीत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यात धनगर बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या वाडीत नविन ट्रान्सफार्मर मंजूर आहे मात्र त्याचे काम गेले तीन महिने प्रलंबित आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून याची तात्काळ दखल घेऊन हा ट्रान्सफॉर्मर…

Read More
You cannot copy content of this page