मंत्री दीपक केसरकर:धनुष्यावर बोलण्याचा पूर्वी कॉग्रेसमध्मे असलेल्या वैभव नाईक यांना अधिकार नाही….
⚡सावंतवाडी ता.२५-: संजू परब यांच्यासारखा धडाडीचा कार्यकर्ता आज आमच्या पक्षात आल्याने पक्षांमध्ये नवचैतन्य पसरला आहे त्यांच्या येण्याने पक्षाला नवी उभारी प्राप्त होणार आहे अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान खरा दिवस आज हा संजूचा आहे. शिवसेनेत येण्याची त्यांची यापूर्वीच इच्छा होती मात्र देर आये दुरुस्त आये आता त्यांच्यासोबत राणे साहेबांची ताकद आहे त्यामुळे त्यांचा अधिक फायदा आम्हाला होणार आहे असा चिमटा ही श्री.केसरकर यांनी काढला. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
ते पुढे म्हणाले की चिपी विमानतळाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच लक्ष वेधणार आहे. विमानसेवा बंद होणार नसून मुंबई रूट दुसऱ्या एयर लाईनला दिला जाणार आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या धनुष्यावर बोलण्याचा पूर्वी कॉग्रेसमध्मे असलेल्या वैभव नाईक यांना अधिकार नाही. आता कॉग्रेससोबत गेल्यानं त्यांना जोर वाटत असला तरी शिवसैनिकांना ते मान्य नाही. २७ हजारांच लीड ५० हजारांवर जाईल अन् निलेश राणे विजयी होतील असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
तर सावंतवाडी मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना पक्ष आणि महायुती कडून मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केसरकर यांनी केले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, हेमंत बांदेकर, सत्यवान बांदेकर, मंदार नार्वेकर, दिना नाईक, विनोद सावंत, संजय वरेरकर, योगेश नाईक, क्लेटस फर्नांडीस यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
