जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिंदे शिवसेना पक्ष आणि महायुती कडून मंत्री दिपक केसरकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्री केसरकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
