पावसाळ्याच्या तोंडावर तात्काळ विज वितरणची कामे मार्गी लावा…
सावंतवाडी येथे बैठकीत सर्वपक्षीयांची मागणी; अन्यथा गाठ आमच्याशी.. ⚡सावंतवाडी ता.३०-: पावसाळा तोंडावर आला तरी महावितरण कडून पूर्वतयारी कोणतीच झालेली नसून ह्याचा फटका ग्राहकांना होत आहे. त्यामुळे तात्काळ मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लावा अशी मागणी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज विज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान ज्या ठिकाणी आपल्याला कोणती अडचणी येत असेल तर त्या आपण आम्हाला कळवावे…
