आकेरीतील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल…

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आकेरी गावातील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सर्व युवकांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. .
आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यात दिसून येत आहे.ज्या-ज्या गावात आमदार वैभव नाईक पोहोचतात त्या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.
यावेळी विशाल परब, मनोज माणगावकर,निकिता राणे,प्रतिक राणे,संध्या माणगावकर,अनिकेत सावंत, जयदीप सावंत, हेमंत मेस्त्री,ताता पालव,महेश धुरी, ऋषिकेश धुरी,कृष्णा आकेरकर, सचिन आकेरकर, प्रथमेश आकेरकर,गौरव नाईक,तृप्ती आईर,मनोज सावंत या युवकांनी व युवतींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी माजी जि. सदस्य रमाकांत ताम्हणेकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभागप्रमुख बंड्या कुडतरकर,आकेरी सरपंच महेश जामदार, सुर्या घाडी, कौशल जोशी, शाखाप्रमुख बाळा राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page