गोठणे-गावठणवाडी येथील ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…

मालवण (प्रतिनिधी)

कुडाळ-मालवणचे आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील गोठणे-गावठाणवाडी येथील ग्रामस्थांनी व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. गोठणे गावाचा विकास आम. वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

यावेळी प्रभाकर घाडीगावकर, नामदेव घाडीगावकर,मोहन घाडीगावकर, बाळकृष्ण घाडीगावकर,हेमंत घाडीगावकर ,प्रवीण घाडीगावकर, प्रमोद घाडीगावकर,अनिल घाडीगावकर,मंगेश घाडीगावकर, विनय घाडीगावकर,अंकिता घाडीगावकर ,हर्षदा घाडीगावकर, नमिता घाडीगावकर,प्राजक्ता घाडीगावकर,मीनाक्षी घाडीगावकर, प्रिया घाडीगावकर,रूपा घाडीगावकर, द्रौपदी घाडीगावकर,तन्वी घाडीगावकर,जयश्री घाडीगावकर, सुचिता घाडीगावकर,अमिता घाडीगावकर या ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

गोठणे गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे यावेळी आम. वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी आडवली-मालडी विभाग प्रमुख दीपक चव्हाण, महिला विभागप्रमुख आरती हाटले,शाखाप्रमुख जयराम परब, शाखा संघटक दीपक हटले,बूथ प्रमुख विनय परब,युवासेना शाखाप्रमुख अजित घाडीगावकर,शैलेश चव्हाण, सुहास हाटले,मुरली हाटले,रवींद्र परब, विलास पवार, अंकुश हाटले,मंजुशा हाटले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page