नगर वाचन मंदिरात मराठी रंगभूमी दिन साजरा…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील नगर वाचन मंदिर येथे मराठी रंगभूमी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी उपस्थित कलाकारांच्या नाट्यगीत व नाट्य प्रवेशांच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम रंगला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष श्री. प्रकाश कुशे, सदस्य भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व श्री नटराज पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पंचतुंड नररूंड मालधर या नांदीने आणि भालचंद्र केळुसकर आणि सहकारी यांच्या सुश्राव्य नाट्यगीतांनी झाली. त्यानंतर श्री. संजय शिंदे आणि सौ. शुभदा टीकम यांनी नटसम्राट या नाटकातील एका प्रवेशाचे अभिवाचन केले. श्री. गजानन मांजरेकर, स्वाती तांडेल, सौ. सांडव व सहकारी यांनी एका पेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातील एक प्रवेश, दिंडी, विनोदी नाटीका हे कार्यक्रम सादर झाले. या कार्यक्रमाला बहुसंख्य नाट्यप्रेमी उपस्थित होते.

You cannot copy content of this page