Global Maharashtra Breaking News

आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला…

⚡आंबोली, ता.६-: येथील घाटात पूर्वीचा वस चाळीस फुट येथे एक मोठा दगड रस्त्यावर कोसळला .पहाटे ची घटना असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.याठिकाणी पावसाळ्यात किरकोळ दगड पड ण्याच्या घटना नेहमी घडत असतात. अमावस्या दिवशी गुरुत्वकर्षण जास्त असल्याने भुगर्भीय हालचाली यादिवशी जास्त होतात त्यामुळे पावसाळ्यात निखळलेला अधांतरी दगड कोसळतो अशी एखादी घटना घडते असे तज्ञांचे मत…

Read More

संजू परबांनी शहरात कमी झालेलं मतदानाचा आत्मपरीक्षण करावे…

एकनाथ नाडकर्णी; आमदारकीचे तिकीट पाहिजे तर पक्षाकडे मागणी करावी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: संजू परबांनी आमदारकी पाहिजे असेल तर त्यांनी पक्षाकडे तशी मागणी करावी उगाच बोलून अंतर्गत वाद निर्माण करू नये असा पलटवार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केला.दरम्यान राजन तेलींवर टीका करण्यापेक्षा संजू परबांनी सावंतवाडी शहरात झालेले मतदान पाहावे आणि आत्मपरीक्षण करावे असा टोला…

Read More

लोकशाहीमध्ये हार-जीत होत असते, त्यामुळे नाराज व्हायच नाही…

अर्चना घारे: राज्यात महाविकास आघाडीचा विजय हा आमच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा.. ⚡सावंतवाडी ता.०५-: लोकशाहीमध्ये निवडणुकीत हार-जीत होत असते. यात नाराज व्हायचे नाही. संयम सोडायचा नसतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेल्या सर्व मतदार, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी, तसेच महिला, माता भगिनीं यांचे सौ. अर्चना घारे परब यांनी…

Read More

देवगड येथील खलाशाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू…

⚡देवगड ता.०५-:देवगड बंदर येथे यशवंत नारायण खांदाळे यांच्या नौकेवर काम करणारा खलाशी प्रकाश विद्याधर प्रधान वय २४ यांच्या पोटात दुखू लागल्याने येथील जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला ही घटना बुधवार ५ जून रोजी पहाटे २:१५ च्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड बंदरातील यशवंत नारायण खांदाळे (रा राजकोट…

Read More

पर्यावरण दिनी सायकल रॅली व वृक्षांची लागवड…

⚡वेंगुर्ला ता.०५-: हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षतोड, प्लॅस्टीकचा अतिवापर आणि जैवविविधतेचा -हास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्ष ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आज बुधवारी सायकल रॅली व शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Read More

कीटकांचा त्रास कमी झाला नाहीतर आत्मदहन…

नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थांचा इशारा:वरिष्ठ गोदाम अधिकारी ७ जूनला करणार गोदामाची पाहणी..  ⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ एमआयडीसी मध्ये असलेल्या महाराष्ट्र वखार महामंडळाच्या धान्य गोदामातून वस्तीत येत असलेल्या टोकासदृश्य कीटकांचा त्रास अजूनही संपलेला नसल्याने या रहिवाशांनी आज गोदामासमोर आमरण उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. तीन-तीन वेळा भेटूनसुद्धा गोदाम साठा अधीक्षक  समृद्धी नांदगावकर कीटकांच्या बंदोबस्ताबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याने…

Read More

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपात पक्षप्रवेश…

⚡कणकवली ता.०५-: खारेपाटण गावच्या सरपंच प्राची इस्वलकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ओम गणेशवर झालेल्या पक्षप्रवेशावेळी माजी जि. प. सभापती बाळा जठार, माजी पं स सभापती दिलीप तळेकर, माजी पं स सदस्य तृप्ती माळवदे, शक्तीकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, राजू वरुणकर , सुधीर कुबल, भाऊ…

Read More

माठेवाडा येथील वृद्ध हेमलता बांदेकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील माठेवाडा येथील रहिवासी श्रीमती हेमलता राजेंद्रप्रसाद बांदेकर(वय ६७) यांचे आज दुपारी राहत्या घरीच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तिच्या पश्चात भाऊ, भाचे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.उमेश नाटेकर यांची ती बहीण तर हॉटेल व्यवसायिक औदुंबर नाटेकर यांची ती आते होय.

Read More

भोसले नॉलेज सिटीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.०५-: येथील भोसले नॉलेज सिटी या शैक्षणिक संकुलाच्या स्थापनेला उद्या गुरुवार, ६ जून रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१४ साली सुरु झालेल्या या संस्थेत पॉलिटेक्निक व डिग्री इंजिनिअरिंग, एम.फार्मसी, बी.फार्मसी, डी.फार्मसी, तसेच सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल यासारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संस्थेतून व्यावसायिक शिक्षण घेऊन बाहेर…

Read More

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी वन विभागामध्ये दुर्मिळ वनस्पतींबाबत कार्यशाळा…

⚡सावंतवाडी ता.०५-: आज जगभर साजऱ्या होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या वनरक्षक तसेच सावंतवाडी व आंबोली परिक्षेत्रातील वन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी दुर्मिळ वनस्पतींची ओळख व संवर्धन याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदरच्या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून कुडाळ मधील पिंगुळी येथे राहणारे वनस्पतीतज्ञ श्री.मिलिंद पाटील तसेच जिल्हा अधिक्षक भूम अभिलेख श्री.सुजितकुमार…

Read More
You cannot copy content of this page