राजन तेली:परिस्थिती बदलायची असेल तर आता आमदार बदलणे आवश्यक..
⚡वेंगुर्ला ता.१४-: येथील मतदारसंघातील रुग्णालयात डॉक्टर नाही ही लाजिरवाणी बाब आहे.त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर या मतदारसंघात बदल करा, आमदार दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षे आमदार असताना मतदारसंघात काम केले नाही त्यामुळे त्यांना आता याठिकाणी थारा देऊ नका असे आवाहन आज येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी केले.श्री तेली हे प्रचारानिमित्त आज वेंगुर्ला दौऱ्यावर होते.यावेळी ते खानोली येथे बोलत होते.
यावेळी त्यांनी परुळे बाजारातील व्यापाऱ्यांसह चीपी कुशेवाडा,गाउडवाडी म्हापण केळुस खानोलि दाबोली आदी गावात जाऊन मतदारांशी चर्चा केली.ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख,ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब,वसंत साटम,अजय सारंग,नीलेश परुळेकर, आकांक्षा चव्हाण,योगेश शेटये,मनोहर येरम,वासुदेव माधव, लवू मेस्त्री,विजय गोलेकर,विश्वनाथ म्हापनकर,अभय परुळेकर,पंकज शिरसाट,अशोक पाटकर,जयवंत राऊळ,रोहित म्हापनकर आदी उपस्थित होते. श्री तेली यांनी घरा घरात जाऊन प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
श्री तेली पुढे म्हणाले ही निवडणूक भवितव्य घडविणारी निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही जागरूकपणे या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ठाकरे शिवसेनेला मतदान केले पाहिजे या ठिकाणी रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे अनेकांची गैरसोय निर्माण होत आहेत या ठिकाणी रोजगार देणारे प्रकल्प नाही त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर आता आमदार बदलणे आवश्यक आहे या ठिकाणी निवडून आल्यानंतर मुंबईला जाऊन बसायचे आणि पुढे दोन महिन्यात निवडणूक असल्यावर या ठिकाणी येऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे काम येथील आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे त्यामुळे यांच्या भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीला म्हणजेच मशाल चिन्हा समोर बटन दाबून मतदान करावे असेही आवाहन त्यांनी करत येत्या सहा महिन्यात या मतदारसंघात विकास झालेला दिसेल अन्यथा मी तुमच्यासमोर येणार नाही असेही त्यांनी सांगितले.
