एकदा साथ द्या, तुमचं भवितव्य उज्वल करतो…

विशाल परब यांची तरुणाला हाक:२३ तारखेला माझा विजय निश्चित; सर्वजण गुलाल उधळायला या..

⚡सावंतवाडी ता.१४-: विशाल परब सारखा तरुणाला आज जर तुम्ही साथ दिलात तर विशाल सारखे असे अनेक तरुण भविष्यात घडतील व आपल्या सावंतवाडी चे नाव उज्वल करतील त्यामुळे तुम्ही मला सर्वांनी एकदा साथ द्या मी तुमच्या भवितव्यासाठी तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिन असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज इथं व्यक्त केले.

दरम्यान विशाल परब हा आमदार होणारच त्यामुळे तुम्ही सर्वांनी निश्चय करा आणि 23 तारीख ला माझा गुलाल उधळायला तुम्ही सर्वांनी या असे आव्हाने त्यांनी यावेळी उपस्थित तरुणांना केले.

You cannot copy content of this page