बांदा शहर परिसराला आज विजांच्या गडगडाटसह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपले…

⚡बांदा ता.१४-: बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी उशिरा विजांच्या गडगडाटसह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. अचानक पाऊस आल्याने कापणी करून ठेवलेले भात सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अलर्ट जाहीर केला होता. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी उशिरा विजांच्या गडगडाटसह मुसळधार अवकाळी पावसास प्रारंभ झाला. तब्बल दोन तास पावसाने झोडपून काढले.
सध्या भात कापणीचा हंगाम सुरु आहे. अचानक मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापणी केलेले भात पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कापलेले भात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक झाली. अजून दोन दिवस प्रशासनाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

You cannot copy content of this page