पाच किलो रास्त धान्यसाठी २०० रुपये प्रवास खर्च…

दीपक केसरकर यांचे दुर्लक्ष:राजन तेली यांच्याकडे वृद्ध महिलेची लक्ष देण्याची मागणी..

⚡सावंतवाडी ता.१४-:
सामान्य लोकांना कमी खर्चात अन्नधान्य सहज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.मात्र आम्हाला या ठिकाणी चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू साठी दोनशे रुपये प्रवासासाठी खर्च करावे लागत आहेत या ठिकाणी एसटी बसची कोणतीही सेवा नसल्यामुळे गैरसोय होत आहे.आमदार दीपक केसरकर या ठिकाणी लक्ष देत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे आता तुम्हीच आमच्याकडे लक्ष द्या अशी मागणी परुळे येथील वृद्ध महिला प्रफुल्लता नेवाळकर यांनी आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्याकडे केली.

दरम्यान याठिकाणी आमदार झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार आहे असे तेली यांनी सांगितले.
श्री तेली यांनी परुळे बाजारातील व्यापाऱ्यांसह चीपी कुशेवाडा, नेवाळेवाडी म्हापण केळुस खानोलि, वेतोरे, होडावडे आदी गावात जाऊन मतदारांशी चर्चा केली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख,ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब,वसंत साटम,अजय सारंग,नीलेश परुळेकर, आकांक्षा चव्हाण,योगेश शेटये,मनोहर येरम,वासुदेव माधव, लवू मेस्त्री,विजय गोलेकर,विश्वनाथ म्हापनकर,अभय परुळेकर,पंकज शिरसाट,अशोक पाटकर,जयवंत राऊळ,रोहित म्हापनकर आदी उपस्थित होते. चिपी नेवाळेवाडी येथे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी श्री तेली यांच्याकडे गावातील समस्यांचा ग्रामस्थांनी पाढाच वाचला.
यावेळी या दौऱ्यात ग्रामस्थांनी केसकर यांच्या विषयी जोरदार नाराजी व्यक्त करत आमदार केसरकर गेले पाच वर्षे याठिकाणी गावात दिसले सुद्धा नाहीत. त्यामुळे आता गावात येऊन त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही.याठिकाणी मुबलक पाणी नाही,रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.याकडे वारंवार मागणी केली मात्र कोणीच लक्ष् दिले नाही आमच्या गावात बस फेरी नियमित येत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे तुम्ही तरी आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

You cannot copy content of this page