कालेलीत उबाठा गटाला धक्का, निलेश राणेंच्या उपस्थितीत उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡कुडाळ ता.१४-; कुडाळ तालुक्यातील कालेली येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गेली अनेक वर्षे आम्ही वैभव नाईक यांच्यासोबत प्रमाणिक होतो मात्र आमचे मुलभूत प्रश्नही ते सोडवू शकले नाहीत त्यामुळे आम्ही आज विकासाच्या मुद्यावर निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश करत आहोत अशी प्रतिक्रिया प्रवेशकर्त्यांनी दिली. यावेळी प्रविण घाडी, संजय घाडी, सचिन परब, मनोज परब, संदेश घाडी, नितीन परब, सीताराम परब, प्रणाली घाडी, अमोल राऊळ, मोहन सावंत, योगेश सावंत, देवदास जाधव, सुभाष वासकर, भाई वासकर, मधुकर सावंत, संदेश सावंत, विक्रम अरुण सावंत, रुपेश घाडी, आदित्य सावंत, दशरथ मेस्त्री, भगवान परब आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रकाश मोर्ये, पप्या तवटे, भाई बेळणेकर, मोहन सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page