अवैध वाळू वाहतूकीला महसूल प्रशासनाचाच ‘सपोर्ट’…
सागर जाधव यांचा आरोप:अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार.. ⚡मालवण ता.२०-: अवैध वाळू भरून भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने जाणारा डंपर कोळंब येथे पलटी होऊन अपघात झाला. कोणालाही न जुमानता राजरोसपणे वाळूची अवैध पद्धतीने आणि भरधाव वेगाने रात्रीच्या वेळी वाहतूक सुरु असून महसूल विभागाकडून केवळ दिखाव्यासाठी एखादी कारवाई करून “मी मारल्यासारखं आणि तू रडल्यासारखं कर” असे…
