सावंतवाडी ता.२०- सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा भंडारी भवनाच्या टेरेसवरील सभागृहात प्रभारी अध्यक्ष श्री.प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेस उपाध्यक्ष श्री.देविदास आडारकर, श्री.गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार श्री.वाडकर,.सचिव श्री.दिलीप पेडणेकर, स.सचिव श्री.नामदेव साटेलकर, सदस्य श्री. हनुमंत पेडणेकर, श्री ज्ञानदिप राऊळ, श्री.दिपक जोशी, श्री.निलेश कुडव, श्री. संजय पिळणकर, श्री.सिद्धार्थ पराडकर. श्री.रत्नाकर नाईक, श्री.लवू कुडव , श्री.ज्ञानदिप राऊळ, सल्लागार श्री.गुरुदास पेडणेकर श्री.कमलाकांत मुंडये उपस्थित होते.
प्रारंभी श्री नामदेव साटेलकर यांनी मंडळाचा वार्षिक अहवाल वाचून मंडळाची प्रगती व पुढील उपक्रम, कार्यक्रम सर्वांसमोर ठेवले.
श्री. दिलीप पेडणेकर यानी 2022,23,24 कालावधीतील मंडळाचा, वसतिगृहाचा जमाखर्चाचे वाचन केले. महिला वसतिगृहच्या व मंडळाच्या समस्याबाबत समग्र चर्चा करण्यात आली. मंडळाची प्रगती, कार्यक्रम याबाबत सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
महिला दिन, रक्तगट तपासणी, रक्तदान, विद्यार्थी गुणगौरव, क्रीडास्पर्धा, वधु-वर मेळावा, सहल, स्नेह मेळावा, दिनदर्शिका यासर्व मंडळाच्या उपक्रमात उत्साहाने सहकार्य करण्याचे सर्वानी मान्य केले.
पुढील तीन वर्षांसाठी विद्यमान कार्यकारिणीत श्री. राजेंद्र बिर्जे, श्री. सुरेश राऊळ, दिपक नाईक नंदकिशोर कोंडये, शंकर साळगावकर तर सल्लागार सतीश नाईक, नारायण मसूरकर यांची निवड करण्यात आली.
शेवटी दाते, व सर्वचे सदस्यांचे शुभेच्छापूर्वक आधार संजय पिळणकर यानी मानले. सभेची सांगता झाली.
यावेळी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास आगरकर, उपाध्यक्ष बाळा आकेरकर, उपाध्यक्ष हनुमंत पेडणेकर, सचिव दिलीप पडणेकर ,सहसचिव नामदेव साटेलकर, खजिनदार चंद्रकांत वाडकर सदस्य राजेद दिर्वे, नंदकिशोर कोंडये, शंकर साळगावकर, दिपक नाईक, लवू कुडव, दिपक जोशी, निलेश कुडव, संजय पिळणकर, ज्ञानदीप राऊळ, सिद्धार्थ पराडकर, देवता पडणेकर, समता सूर्याजी, सुरेश राऊळ उपस्थित होते.
